भाजपा खासदार प्रताप सारंगी (Pratap Sarangi) हे संसद परिसरात खाली पडल्याने जखमी झाले आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. संसद परिसरात (sansad winter session 2024) अमित शाह यांनी केलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलच्या वक्तव्यावरून संसदेबाहेर आंदोलन करणारे राहुल गांधी व त्यांच्या खासदारांना संसदेत जाण्यापासून अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदारांना राहुल गांधी यांनी धक्का दिला, असा आरोप केला जात आहे.
(हेही वाचा – ICC Test Championship : भारतीय संघ अजूनही आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठू शकतो?)
भाजपाचे दोन खासदार जखमी झाले आहेत. भाजपा खासदार प्रताप सारंगी हे खाली पडल्याने जखमी झाले आहेत. प्रताप सारंगी व अन्य एका भाजप खासदाराला दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी राहुल गांधी यांचा धिक्कार केला आहे. भाजपा राहुल गांधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची तयारी करत आहे.
भाजपा खासदार सारंगी म्हणाले की, यांच्या दाव्यानुसार ते एका ठिकाणी उभे होते. तेव्हा राहुल गांधी यांनी दुसऱ्या खासदाराला धक्का दिला, तो खासदार माझ्यावर कोसळला. यामुळे मी खाली पडलो आणि माझ्या डोक्याला दुखापत झाली.
राहुल गांधींनीही या प्रकरणी भाजपा आमदारांवरच आरोप केले आहेत. आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजप खासदार वाईट वागणूक देत होते, मला संसदेत जाण्यापासून रोखत होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
संसद काही कुस्तीचे मैदान नाही – किरेन रिजिजू
मी राहुल गांधी यांना विचारू इच्छितो की, संसद ही काय शारीरिक दाकद दाखविण्याची जागा आहे का? जर सर्व लोक आपली ताकद दाखवायला लागले तर संसद कशी चालेल, पैलवानी दाखविण्याचा अर्थ काय आहे, ही कराटे, कुंगफू खेळायची जागा नाही कि कोणा राजाची खासगी संपत्ती नाही. हे लोकशाहीचे मंदिर आहे. संसद काही कुस्तीचे मैदान नाही, बॉक्सिंगचा आखाडा नाही, अशा शब्दांत रिजिजू यांनी फटकारले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community