Rahul Gandhi यांच्या कृत्याने डॉ. आंबेडकरांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील : किरण रिजिजू

99
Rahul Gandhi यांच्या कृत्याने डॉ. आंबेडकरांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील : किरण रिजिजू
  • खास प्रतिनिधी 

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांच्या हातामध्ये असलेल्या लाल रंगाच्या संविधानाच्या प्रतिवरुन निशाणा साधत राहुल गांधी यांच्या हातात लाल संविधान आहे असं म्हणत राहुल गांधी यांना नक्षलवाद्यांनी घेरले आहे असा आरोप केला. लाल संविधान हातात घेऊन गांधी कोणाला इशारा देत आहेत? असा सवालही उपस्थित केला.

यावर प्रतिक्रिया देताना संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू म्हणाले, “संविधानाची अनेकदा मोडतोड करणाऱ्या आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अवमान करणाऱ्या काँग्रेसला जनता यावेळी माफ करणार नाही. आतापर्यंत केलेल्या संविधानाच्या अवमानाबद्दल आधी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी रिजिजू यांनी गुरुवारी ७ नोव्हेंबर या दिवशी केली. भाजपा मिडिया सेंटर मध्ये झालेल्या पत्रकार परीषदेत रिजिजू बोलत होते. यावेळी भाजपा केंद्रीय माध्यम समन्वयक के. के. उपाध्याय, राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, डॉ. सय्यद जफर इस्लाम, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – US Presidential Election 2024 : ‘या’ १० गोष्टींमुळे साध्य झाला डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय)

कोऱ्या कागदाची प्रत नाचवली

“मागास वर्गातून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी आतापर्यंत मोठी जबाबदारी सोपवल्याने मी जबाबदारीने सांगू शकतो की, जी व्यक्ती संविधानाचा सन्मान करत नाही, त्याच्या हातात संविधानाची प्रत आणि त्याच्या तोंडून संविधान शब्द निघणे, हे निषेधार्ह आहे. निळ्या रंगाऐवजी लाल रंगाचे मुखपृष्ठ घालून आत कोरे कागद असलेल्या नकली संविधानाची प्रत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नागपुरात नाचवली. त्यांच्या या कृत्याने डॉ. आंबेडकरांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील,” असे रिजिजू यावेळी म्हणाले.

नेहरूंकडून डॉ. आंबेडकरांचा अपमान

रिजिजू यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले जाऊ नये यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे नाव यादीतून वगळले होते. एम. के. गांधी आणि इतर काहींनी हे पहिले सरकार निवडणुकीद्वारे होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले तेव्हा कुठे त्यांना देशाचे पहिले कायदा मंत्रीपद देण्यात आले. तेव्हापासून नेहरू यांनी डॉ. आंबेडकर यांचा कायम अपमान केला. अखेरीस डॉ. आंबेडकर यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे जिथे जाऊन निवडणुका लढवल्या तिथे तिथे काँग्रेसने प्रयत्नपूर्वक त्यांचा पराभव केला. २०१५ पर्यंत काँग्रेसने संविधान दिन का साजरा केला नाही,” असा सवालही रिजिजू यांनी उपस्थित केला.

(हेही वाचा – नक्षलवाद्यांची मदत घेण्यासाठी राहुल गांधींच्या हाती लाल पुस्तक; Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल)

नेहरूंचा आरक्षणाला विरोध

“आणीबाणी लादून तर काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला होता. काँग्रेसने आधी संविधानावर त्यांनी वारंवार केलेल्या हल्ल्यांबाबत उत्तर द्यावे. तेव्हाच हातात संविधान धरावे आणि डॉ. आंबेडकर यांचे नाव घ्यावे. संविधान आणि डॉ. आंबेडकर यांचे नाव घेण्याचा काँग्रेसला काहीही अधिकार नाही. नेहरू यांनीच सर्वप्रथम आरक्षणाला विरोध केला, याची नोंद संसदेच्या रेकॉर्डमध्ये आहे. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नाकारले होते, मात्र जवाहरलाल नेहरू यांना देण्यात आले होते, हेही लक्षात घेतले पाहिजे,” असे ते रिजिजू म्हणाले. (Rahul Gandhi)

काँग्रेसला साथ, संविधानाचा घात

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “कोऱ्या ‘नोटपॅड’ला संविधानाचे नाव देऊन ते वाटणाऱ्या काँग्रेसने आपल्याला हवं तसं संविधान लिहिण्याचा डाव अप्रत्यक्षपणे उघड केलाय का? नाहीतरी संविधान आरक्षण रद्द करण्याची भाषा काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून करत आहे. काँग्रेसला साथ म्हणजे संविधानाचा घात…”

(हेही वाचा – BMC : प्रत्येक वॉर्डला स्वतंत्र शहर गृहित धरुन शहराच्या विकासाचे नियोजन करा, आयुक्तांचे विभागाला निर्देश)

काँग्रेसकडून थिल्लरपणा कबूल

भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “लोकसभा निवडणुकीपासून हातात संविधान घेऊन ‘संविधान वाचवा, संविधान वाचवा’ म्हणून जो काही कांगावा तुम्ही करत आहात त्यातला खोटेपणा जनतेच्या कधीच लक्षात आला. पण काल मात्र तुम्ही हद्दच केली. संविधानाच्या कोऱ्या प्रति तुम्ही वाटल्या आणि तीच प्रत हातात घेऊन खोटी-नाटी आश्वासन सुद्धा दिलो. वर तुमचे नेते विजय वडेट्टीवार तुमची बाजू घेण्याच्या नादात आणि भाजपाला खोटं ठरवायच्या नादात म्हणाले ते लाल रंगाचं नोटपॅड होतं. म्हणजेच एका अर्थाने त्यांनी तुमचा हा थिल्लरपणा कबूलसुद्धा केला. कोरं संविधान छापणं, हा आमच्या महामानवाचा अपमान आहे आणि तो आम्ही भारतीय कदापि सहन करणार नाही” असा इशारा वाघ यांनी दिला. तसेच “तुमच्यासाठी शाहू-फुले-आंबेडकर हे फक्त भाषण करण्याचे मुद्दे असतील, आमच्यासाठी तो स्वाभिमान आहे आणि संविधान म्हणजे भारताचा आत्मा आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाहीत,” असे मत त्यांनी व्यक्त केले. (Rahul Gandhi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.