पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते की, काँग्रेसचे शाहजादा (राहुल गांधी) यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायला सांगा आणि त्याआधी ‘हिंदुहृदयसम्राट’ (Hinduhridaysamrat) असे म्हणायला सांगा. त्यानंतर महाराष्ट्रात प्रचारसभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी ‘आपण मोदींचे आव्हान स्वीकारत आहोत’, असे म्हणत केवळ बाळासाहेब ठाकरे असे नाव घेतले पण ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणण्यास जीभ कचरली. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी X वर पोस्ट करताना शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहिली, मात्र त्यात त्यांनीही बाळासाहेबांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ (Hinduhridaysamrat) असा उल्लेख करण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे भाऊ-बहीण दोघांनी पंतप्रधान मोदींचे अर्धवटच आव्हान स्वीकारले.
काय आव्हान नरेंद्र मोदींनी दिलेले?
उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दोन चांगले शब्द बोलायला सांगा, त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायला सांगा ‘हिंदुहृयसम्राट’ (Hinduhridaysamrat) असे बोलायला सांगा.
‘हिंदुहृयसम्राट’ म्हणण्याचे प्रियंका गांधी यांनी टाळले
प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची प्रचारसभा शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी शिर्डीत झाली, तेव्हा त्या बोलताना म्हणाल्या, माझ्या भावाच्या संदर्भात नरेंद्र मोदी सतत बाळासाहेबांचे नाव घेतात. मी राहुल गांधींची बहीण आहे. मोदीजी ऐकून घ्या. बाळासाहेब ठाकरेंचे नाव ऐकून घ्या. हेही ऐकून घ्या की, आमची विचारधारा, आमच्या पक्षाचे विचार वेगवेगळे होते. परंतु, ना बाळसाहेब ठाकरे आणि नाही काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला असता, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. पण यावेळी प्रियंका गांधी यांनी बाळासाहेबांचे फक्त नाव घेतले पण पंतप्रधान मोदी यांनी ‘हिंदुहृयसम्राट’ (Hinduhridaysamrat) उच्चारण्याचे आव्हान दिले होते, तोच शब्द प्रियंका गांधींनी (Priyanka Gandhi) म्हटला नाही.
(हेही वाचा गोध्रा हत्याकांडावर आधारित ‘The Sabarmati Report’ चित्रपट; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक)
राहुल गांधी बाळासाहेबांना ना शिवसेनाप्रमुख म्हणाले ना ‘हिंदुहृयसम्राट’
बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या १२व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना परिवारासोबत आहोत, असे राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान
दरम्यान, या पोस्टनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांना एक आव्हान दिले आहे. ही चांगली गोष्ट आहे. आजवर त्यांनी असे बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता. शिवसेनेबाबत त्यांच्या मनात काय भावना आहेत, ते माहिती नाही. पण हिंमत असेल तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट (Hinduhridaysamrat) म्हणून दाखवावे, कारण असे संबोधन स्वतः उद्धव ठाकरे हेही करत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
Join Our WhatsApp Community