काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या १५० दिवसांच्या भारत जोडो यात्रेवर आहेत. त्यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील एका वादग्रस्त कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली होती. राहुल आणि पोन्नैया यांच्यातील संभाषणाचा काही भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना ही भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा आहे, अशा शब्दांत टीका केली.
जात्यांध ख्रिस्ती पाद्र्यांकडून हिंदू देवतांची नालस्ती राहुलजी किती प्रेमाने आणि शांतपणे ऐकून घेतायत पाहा…
हे भारत जोडो आहे की हिंदू झोडो??? pic.twitter.com/VhhfolmUVe
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 10, 2022
येशू हाच खरा देव!
मुट्टीडिचन पराई चर्चमधील राहुल गांधी आणि ख्रिस्ती धर्मगुरू यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे पाद्रींना ‘येशू ख्रिस्त हे देवाचे रूप आहे? हे खरे आहे का?’ असे विचारताना ऐकू येते. त्यांच्या प्रश्नावर पास्टर जॉर्ज पोन्नैया म्हणाले, “नाही, तोच खरा देव आहे.” पोन्नय्या यांनी चिथावणीखोर विधाने केल्याचा इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, द्रमुक मंत्री आणि इतरांविरुद्ध अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून त्याला गेल्या वर्षी जुलैमध्ये मदुराईमधील कालिकुडी येथे अटक करण्यात आली होती.
(हेही वाचा शिंदे सरकारचे शेतक-यांना मोठे गिफ्ट; राज्यात ‘मु्ख्यमंत्री किसान योजना’ होणार लागू)
भारत जोडो नव्हे भारत तोडो यात्रा – भाजपा
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या वक्तव्यावर हल्ला चढवला असून या यात्रेला ‘भारत जोडो नव्हे भारत तोडो यात्रा’, असे म्हटले आहे. ‘जॉर्ज पोन्नैया यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. ते म्हणतात की, ‘येशू हा एकमेव देव आहे. या व्यक्तीला यापूर्वीही हिंदू धर्माविरुद्ध द्वेषयुक्त वक्तव्य केल्याप्रकरणी जॉर्ज पोन्नैया यांना अटक करण्यात आली होती. आता राहुल गांधींच्या बचावासाठी काँग्रेस पक्ष पुढे आला आहे. जयराम रमेश म्हणाले, ‘भाजपच्या हेट फॅक्टरीचे एक घृणास्पद ट्विट व्हायरल होत आहे. ऑडिओमध्ये जे रेकॉर्ड केले आहे त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही.’
Join Our WhatsApp Community