अग्निवीर योजनेंतर्गत लोकांना प्रथम सैन्यात नोकरी मिळेल आणि नंतर राज्य पोलिसांत नोकरी मिळू शकेल. तरुणांना ही योजना आवडते. त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने तरुण मुलाखती देण्यासाठी येत आहेत. राहुल ना सैन्यात भरती होऊ शकतात, ना अग्निवीर होऊ शकतात. ते स्वतः काहीही कमवू शकत नाहीत आणि खाऊ शकत नाहीत. ते त्यांच्या आईवर ओझं आहेत. ते देशद्रोहाचं कृत्य करतायत. मी त्यांना ताकीद देतो की, सैन्याबद्दल काहीही चुकीचं बोलू नका, असा इशारा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी राहुल गांधी यांनी दिला आहे.
(हेही वाचा – Super Expressway : देशात तयार होणार ‘सुपर एक्स्प्रेस-वे’)
राहुल गांधींनी आधी सैन्यात नोकरी करावी
आपल्या अनेक भाषणांमध्ये बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) अग्नीवीर योजना बंद करण्यात यावी, अशी मागणी करत आहेत. लोकसभा निवडणूक जिंकून इंडि आघाडी सत्तेत आल्यास अग्निवीर योजना रद्द करून डस्टबिनमध्ये फेकून देऊ, असे काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारसभांमध्ये सातत्याने सांगत आहेत. या सूत्रावर आता भाजपने टीकेची झोड उठवली आहे. देशातील लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) शेवटच्या टप्प्यातील प्रचारात अग्नीवीर योजनेचा मुद्दा गाजत आहे. त्यावर भाजपने म्हटले आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधींनी आधी सैन्यात नोकरी करावी, लष्कराला समजून घ्यावं आणि त्यानंतरच अग्नीवीर योजनेबाबत बोलावं. राहुल गांधींच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही समाचार घेतला आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) बोलताना म्हणाले की, काँग्रेसनं देशात गोंधळ घालणं थांबवावं, काँग्रेसने बोफोर्स, जीप, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा केला. काँग्रेसने लष्कराला काहीही दिले नाही. लष्कराला वन रँक, वन पेन्शन दिली गेली नाही, तर मोदी सरकारने लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट, शस्त्रे आणि दारूगोळा दिला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community