Rahul Gandhi : काँग्रेसच्या ‘खटाखट’ योजनेवर निवडणूक कायद्यातंर्गत लाचखोरीचे आरोप, दिल्लीतील वकिलाची खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी

सत्तेवर आल्यास १ लाख रुपये देण्याचे आश्वासन देऊन काँग्रेसने मतदारांना लाच दिल्याचा आरोप दिल्लीतील वकील विभोर आनंद यांनी केला.

393
Rahul Gandhi:काँग्रेसच्या 'खटाखट' योजनेवर निवडणूक कायद्यांतर्गत लाचखोरीचे आरोप, दिल्लीतील वकिलाची खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी

राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या ९९ नवनिर्वाचित खासदारांवरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील वकील विभोर आनंद यांनी सर्व ९९ काँग्रेस खासदारांना अपात्र ठरवण्याची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. (Rahul Gandhi)

सत्तेवर आल्यास १ लाख रुपये देण्याचे आश्वासन देऊन काँग्रेसने मतदारांना लाच दिल्याचा आरोप दिल्लीतील वकील विभोर आनंद यांनी केला. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, काँग्रेसने लोक प्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२३ (१) अंतर्गत गुन्हा केला आहे. (Rahul Gandhi)

(हेही वाचा – Shiv Sena Bhavan Banner : शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावून भाजपाने उद्धव ठाकरे यांना डिवचले!)

काँग्रेसने गरीब आणि महिलांना १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे वचन पूर्ण करण्यासाठी दबाव निर्माण होत आहे. अलीकडेच आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि राघव चड्ढा यांना दिल्लीत महिलांनी धक्काबुक्की केली होती.

‘गॅरंटी कार्ड’साठी कॉंग्रेस कार्यालयाबाहेर रांगा
आम आदमी पक्षाचे खासदार संजय राऊतांची भेट घेणार होते. या काळात महिलांनी त्यांना घेराव घालून घालून सांगितले की, १ लाख रुपये देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले पाहिजे. निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी दिलेले ‘गॅरंटी कार्ड’ मागण्यासाठी लखनौमधील अनेक महिलांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगा लावल्या होत्या. दक्षिणेकडील राज्यांमध्येही ही घटना दिसून आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.