राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ, वीर सावरकरांचा अवमान, उद्धव ठाकरे निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल!

98

सवंग लोकप्रसिद्धीसाठी काँग्रेसचे नेते राहूल गांधी हे कायम स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करत असतात. त्यानुसार भारत जोडो यात्रेत सध्या राहुल गांधी आहेत आणि या यात्रेतही त्यांनी भारतीय संस्कृती, हिंदू देवता यांचा आधीच अवमान केला असतांना त्यांनी आता वीर सावरकरांचाही अवमान केला आहे. राहुल यांची यात्रा कर्नाटकात पोहोचली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ‘संघ आणि सावकरकरांनी इंग्रजांना मदतच केली. वीर सावरकरांना तर इंग्रजांकडून पैसे मिळत होते’, असे संतापजनक वक्तव्य केले. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला, त्याचबरोबर अडीच वर्षांपूर्वी सत्तेसाठी हिंदुत्व खुंटीला टांगून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही, ‘राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे निषेध करणार का’, अशा शब्दांत आव्हान दिले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल गांधी यांनी अवमान केला, त्यामुळे आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो. काँग्रेसने वारंवार वीर सावरकर यांना अपमानित केले, कारण वीर सावरकरांच्या पाठीशी भारतीय जनता मोठ्या प्रमाणात होती. स्वातंत्र्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली, त्यात वीर सावरकरांना जाणीवपूर्वक अपमानित करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला. ११ वर्षे वीर सावरकरांनी अंदमानच्या काळकोठडीत काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. इतकी मोठी शिक्षा भोगणारे फार थोडे स्वातंत्र्यसैनिक होते. आमच्यासाठी सगळेच स्वातंत्र्यसैनिक महान आहेत. यामध्ये वीर सावरकरांचे वेगळेपण हे आहे की, त्यांनी क्रांतीकारकांना प्रेरणा दिली, क्रांतीची चळवळ त्यांनी उभी केली. आणि अनन्वित अत्याचार सहन करूनही त्याठिकाणी अंदमानच्या काळकोठडीतही ते सातत्याने भारतीय स्वातंत्र्याचाच विचार करत होते. त्याचीच काव्ये लिहीत होते. तिथल्या क्रांतीकारकांना धीर देत होते. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात, कारण राहुल गांधींना स्वातंत्र्याचा इतिहास माहीत नाही. त्यांना ना क्रांतिकारकांची माहिती. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो. उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करणार आहे का? राहुल गांधी यांनी जी भारत जोडो की तोडो यात्रा सुरु केली आहे या यात्रेच्या स्वागतासाठी ते शिवसेनेचे नेते पाठवणार आहेत का आणि त्याठिकाणी राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले त्याचे ते समर्थन करणार आहेत का? याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले पाहिजे. आम्ही राहुल गांधी यांच्या अशा वक्तव्याचा सतत निषेध करत राहू. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी भारतीयांच्या मनामध्ये वीर सावरकरांची जी प्रतिमा आहे ती कधीही ते पुसू शकणार नाहीत.

(हेही वाचा ‘आदिपुरुष’ चित्रपट : पौराणिक चित्रपट धर्मग्रंथ अभ्यासून बनवावेत – हिंदु जनजागृती समिती)

काय म्हणाले राहुल गांधी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांनी ब्रिटिशांना मदत केली होती, सावरकरांना तर इंग्रजांकडून पैसे मिळत होते, अशी टीका करतानाच काँग्रेसनेच स्वातंत्र्याची लढाई लढली, असे राहुल गांधी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.