Rahul Gandhi यांनी पुन्हा वाजवले संविधान धोक्याचे तुणतुणे; Fake Narrative चा केविलवाणा प्रयत्न 

119
Rahul Gandhi यांनी पुन्हा वाजवले संविधान धोक्याचे तुणतुणे; Fake Narative चा केविलवाणा प्रयत्न 
Rahul Gandhi यांनी पुन्हा वाजवले संविधान धोक्याचे तुणतुणे; Fake Narative चा केविलवाणा प्रयत्न 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आले, त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाषण करताना पुन्हा एकदा संविधानांचे तुणतुणे वाजवले. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जाहीर सभांमध्ये खिशातून लाल रंगांचे पुस्तक खिशातून काढत हे संविधान असून ते मोदी सरकारच्या काळात धोक्यात आले असल्याचे Fake Narrative तयार करण्याचा प्रयत्न केला. तसाच केविलवाणा प्रयत्न त्यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात भाषण करताना तेच पुस्तक खिशातून बाहेर काढले आणि संविधान धोक्यात असल्याची ओरड केली. कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) हस्ते करण्यात आले.

राहुल गांधी म्हणतात आज संविधान संपुष्टात आणण्याचा होतोय प्रयत्न 

हिंदुस्थानात आज २ विचारधारांची लढाई आहे. एक विचारधारा संविधानाचं (Constitution) रक्षण करते, समानता आणि एकतेची गोष्ट करते. ती छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आहे. दुसरी विचारधारा जे संविधान संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करतेय. ते सकाळी उठतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विचारधारेचं जे संविधान आहे ते संपवायचं कसं हा विचार करतात. हिंदुस्थानातील संस्थांमध्ये आक्रमण करतात. लोकांना धमकावतात, घाबरवतात आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माथा टेकतात याला काही अर्थ नाही. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेता, त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होता तर तुम्हाला संविधानाचं (Constitution) रक्षण करावं लागेल. विचारधारा खूप जुनी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही ही लढाई सुरू होती. जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा याच विचारधारेने राज्याभिषेक होऊ दिला नाही. ही नवीन गोष्ट नाही. हजारो वर्ष जुनी ही लढाई आहे. ज्या विचारधारेविरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले होते त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस आज लढत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. (Fake Narrative)

( हेही वाचा : पोहरागडावर येणारे PM Narendra Modi पहिले!

देश सर्वांचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जायचंय, अन्याय करायचा नाही हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) देश आणि जगाला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विचारधारेचे आज कोणतं प्रतिक असेल तर ते संविधान आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले, २१ व्या शतकात त्याचे रुपांतर काय असेल तर ते संविधान (Constitution) आहे. यात आपल्याला एकही अशी गोष्ट सापडणार नाही, ज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) लढले नाहीत. संपूर्ण आयुष्य ते लढले, जे कार्य केले, त्यांच्या विचारधारेनेच संविधान आले असे सांगत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपावर टीका केली. जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, शाहू महाराजांसारखे व्यक्ती नसते तर आज संविधान नसते, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.