खासदारकी मिळाल्यानंतर अनेक दिवसांनी राहुल गांधी (Rahul Gandhi Flying Kiss) बुधवार, ९ ऑगस्ट रोजी संसदेत (Smriti Irani) बोलत होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत मणिपूर हिंसाचारावरून सरकारवर टीका केली. तेव्हा सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांच्या टीकेला भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी चोख उत्तर दिलं. अशातच सभागृहातून जात असताना राहुल यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला. लोकसभा सचिवालयाची सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेत असभ्य वर्तनाबाबत सर्वांशी बोलून नियमानुसार कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.
याच पार्श्वभूमीवर (Rahul Gandhi Flying Kiss) भाजप महिला आघाडीकडून आज म्हजेच गुरुवार १० ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी विनंती केली.
(हेही वाचा – Bombay High Court : खड्ड्यांच्या मुद्द्यावरून न्यायालयाने केली पालिका आयुक्तांची कानउघाडणी; म्हणाले …)
नेमकं काय बोलल्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ म्हणाल्या की, “लोकशाहीच्या मंदिरात निंदनीय घटना घडल्या. मणिपूरचा मुद्दा मांडत असताना राहुल गांधी (Rahul Gandhi Flying Kiss) फ्लाईंग किस केलं. त्यांच्या कृत्याला ठाकरे गट आणि काँग्रेसने समर्थन दिले. रोड रोमियो आणि राहुल गांधींमध्ये काही फरक नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर देखील त्यांची मानसिकता तशीच आहे. सोनिया गांधी यांना आम्ही विनंती केली आहे की राहुल गांधींचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांचे लग्न करुन टाका. राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. “
पुढे बोलतांना चित्रा वाघ म्हणाल्या की, देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी (Rahul Gandhi Flying Kiss) यांचे लग्न होणे गरजेचे आहे. ते कधी डोळे मारतात, कधी कधी मिठी मारतात, आता तर फ्लाईंग किस केला. लोकशाहीच्या मंदीरात अनेक निर्णय घेतले जातात. त्या ठिकाणी अशी अभद्र कृती शोभत नाही,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community