सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रचारासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) तमिळनाडूमधून केरळ येथील निलगिरी येथे हेलिकॉप्टरने आले, त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर उतरताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने हेलिकॉप्टरची झडती घेतली. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
#WATCH कांग्रेस नेता राहुल गांधी जिस हेलिकॉप्टर से तमिलनाडु के नीलगिरी पहुंचे, उसकी नीलगिरी में चुनाव आयोग के फ्लाइंग स्क्वाड के अधिकारियों द्वारा जांच की गई।
(वीडियो सोर्स: चुनाव आयोग फ्लाइंग स्क्वाड) pic.twitter.com/pxpkWRm3de
— ANI_HindiNews (@AHindinews) April 15, 2024
(हेही वाचा CM Eknath shinde: मविआत उबाठाची अवस्था उठ बस सेना – मुख्यमंत्री
झडतीमागील कारण सुस्पष्ट नाही
या व्हिडिओमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) हेलिकॉप्टरमधून खाली उतरतात तेव्हा निवडणूक आयोगाचे अधिकारी हेलिकॉप्टरजवळ जाताना दिसत आहे. त्यानंतर ते हेलिकॉप्टरच्या आतील भागाची पाहणी करताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमवारी, १५ एप्रिल रोजी कोझिकोड येथे पोहोचतील, जिथे ते निवडणूक रॅलीला संबोधित करतील आणि मंगळवारी १६ एप्रिल रोजी वायनाडला भेट देतील. त्यानंतर ते गुरुवारी कन्नूर, पलक्कड आणि कोट्टायममध्ये प्रचार करतील. ते त्रिशूर, तिरुअनंतपुरम आणि अलप्पुझालाही भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी तिरुअनंतपुरममधील कट्टाकडा येथे अनुक्रमे तिरुअनंतपुरम आणि अटिंगल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि व्ही मुरलीधरन यांच्या बाजूने प्रचार करण्यासाठी दोन जाहीर सभांना संबोधित करतील. त्यानंतर ते त्रिशूर येथे एका जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती का घेण्यात आली, याविषयी मात्र अद्याप सुस्पष्टता आली नाही.
Join Our WhatsApp Community