राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटीश नागरिकत्व; Subramaniam Swamy यांनी दिले पुरावे

247
राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटीश नागरिकत्व; Subramaniam Swamy यांनी दिले पुरावे
राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटीश नागरिकत्व; Subramaniam Swamy यांनी दिले पुरावे

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नागरिकत्वावरून वाद सुरू झाला आहे. याबाबत दिल्ली येथील उच्च न्यायालयात (Delhi High Court) जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. याआधीही राहुल यांच्या नागरिकत्वावर (Rahul Gandhi Citizenship) प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, मात्र यावेळी या मुद्द्याने जोर पकडला आहे. राहुल यांचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यामुळे राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता अधिक वाढली आहे.  (Subramaniam Swamy)

स्वामी यांची सोशल मीडिया पोस्ट 

सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये राहुल गांधी ब्रिटिश नागरिक (Rahul Gandhi British Citizenship) असल्याचा दावा केला आहे. एका ब्रिटीश कंपनीसाठी भरलेल्या वार्षिक रिटर्नमध्ये काँग्रेस नेत्याने स्वत:ला ब्रिटिश नागरिक असल्याचे घोषित केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  (Subramaniam Swamy)

(हेही वाचा – Election Commission: जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; जाणून घ्या ‘या’ तारखेला होणार मतदान)

२०१९ मध्ये लिहिलेल्या पत्रात

भाजपचे नेते सुब्रमन्यम स्वामी म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे असून, त्यांच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे. याप्रकरणी केंद्र सरकारकडून स्टेटस रिपोर्ट मागवावा, अशी मागणी भाजपा नेत्याने न्यायालयाकडे केली आहे. २०१९ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा दावा केला होता. भारतीय राज्यघटनेच्या कलम ९ चा संदर्भ देत सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत की राहुल हे फक्त एकाच देशाचे नागरिक असू शकतात. 

(हेही वाचा – शहरी भागात बचतगटांची संख्या वाढवावी; CM Eknath Shinde यांचे निर्देश)

हे आरोप केले आहेत

सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की बॅकअप्स लिमिटेड नावाची कंपनी () २००३ मध्ये यूकेमध्ये नोंदणीकृत झाली होती, ज्यामध्ये राहुल गांधी संचालक आणि सचिव होते. २००५ आणि २००६ मध्ये दाखल केलेल्या कंपनीच्या वार्षिक रिटर्नमध्ये, राहुल गांधींची जन्मतारीख १९ जून १९७० अशी नमूद करण्यात आली होती आणि त्यांचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे राहुल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे. सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर पुढील आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते.  (Subramaniam Swamy)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.