राहुल गांधीच माफीवीर, माफीनाम्यांची जंत्रीच सोशल मीडियात व्हायरल

157
सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे, या यात्रेच्या दरम्यान वाशिम येथे बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा अवमान केला. त्यानंतर यांचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला, त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. याप्रकरणी मनसेनेही राहुल गांधी यांच्यावर टीका केली, बुधवार, १७ नोव्हेंबर रोजी रणजित सावरकर यांनी तर राहुल गांधी यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता सोशल मीडियातही राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

राहुल गांधींच्या माफीनाम्याची जंत्री कोणती? 

राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात वीर सावरकर यांनी तुरुंगातून सुटका करवून घेण्यासाठी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती, असे म्हटले होते. आता सोशल मीडियात राहुल गांधी यांनी कितीवेळा माफी मागितली होती, याचा तपशील दाखवला जात आहे. यामध्ये फेसबुकवरील नेहा जाधव यांची फेसबुक पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. यात नेहा जाधव म्हणतात की, माफीवीर कोण है भाई??? सावरकरांनी माफी मागितली की नाही? का मागितली? हा आजच्या काळात महत्त्वाचा विषय नाहीच. त्याचा आता काही फायदा नाही. कारण सावरकर मुळातच हयातीत नाहीत शिवाय ते काही पंतप्रधान पदासाठी भावी उमेदवारही नाहीत. उलट आजच्या काळातल्या राहुल गांधी या युवा नेत्याने किती किती वेळा माफी मागितली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काहींच्या मते ते भावी पंतप्रधान आहेत. मग राहुल गांधीने किती वेळा माफी मागितली हे देखील पहा. भारत तोडो यात्रेच्या शुभेच्छा!

कधी-कधी मागितली होती राहुल गांधी यांनी माफी? 

  • राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना चौकीदार म्हटले होते, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या वक्तव्यावर माफी मागितली होती.

rahul1

  • राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी राहुल गांधी यांनी टीका केली होती, तेव्हाही राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली होती.

RAHUL2

  • संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘मेक इन इंडिया’चा उल्लेख ‘रेप इन इंडिया’ असा केल्यामुळे संसदेत गदारोळ माजला होता, त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.

rahul 3

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.