काँग्रेस नेते राहुल गांधी ‘अपरिपक्व’ आहेत आणि परदेशात भारताची बदनामी करून कोणीही नेता होऊ शकत नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुढे जाऊ शकत नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी केली.
भाजपावर जाती आणि समुदायाच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्याबद्दल विचारले असता केंद्रीय मंत्री (Kiren Rijiju) म्हणाले की, राहुल गांधी हेच आपल्या राजकीय कारकिर्दीत अशा कृत्यांमध्ये गुंतले आहेत. रिजिजू यांनी दावा केला, आता तो उघड झाला आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात नागपुरात त्यांनी संबोधित केलेल्या सभेत संविधानाच्या प्रती वाटण्यात आल्या, ज्याच्या पानांवर एक शब्दही लिहिला नाही. यामुळे ते आणखीनच उघड झाले आहे.
राहुल अनेकदा संविधानाची प्रत दाखवतात आणि भाजपाला राज्यघटना बदलून आरक्षण रद्द करायचे आहे, असा आरोप करतात. याशिवाय रिजिजू (Kiren Rijiju) म्हणाले, “मी त्यांचा आदर करतो कारण त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते (लोकसभेतील) घटनात्मक पद आहे. मात्र, राजकीय दृष्टिकोनातून ते अपरिपक्वता दर्शवतात. काँग्रेसने त्यांना अनेकवेळा ‘लाँच’ केले आहे आणि ‘पुन्हा लॉन्च’ केले आहे, परंतु तरीही त्यांच्यात परिपक्वता नाही, परदेशात भारताची बदनामी करून कोणीही नेता होऊ शकत नाही.
Join Our WhatsApp Community