संसदेच्या एकाही सल्लागार समितीमध्ये Rahul Gandhi नाही; परराष्ट्र व्यवहार समितीमधूनही बाहेर काढले

2024-25 या वर्षासाठी विभाग-संबंधित संसदीय स्थायी समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये काँग्रेस सदस्यांना परराष्ट्र व्यवहारांसह चार प्रमुख समित्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

144
Rahul Gandhi यांच्यावर डॉक्टर्स का आहेत नाराज?

शनिवारी संसदीय सल्लागार समित्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव कोणत्याही समितीमध्ये ठेवण्यात आले नाही. यापूर्वी राहुल गांधी परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीचे सदस्य होते.

शनिवारी संसदीय सल्लागार समित्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव त्यांच्या कोणत्याही समितीमध्ये नाही. यापूर्वी राहुल गांधी परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीचे सदस्य होते. त्याचबरोबर आता नव्या समित्यांमध्ये शरद पवार यांचा गृहखात्याच्या समितीत, सुप्रिया सुळे यांचा संरक्षण खात्यासाठी, पी चिदंबरम यांचा अर्थखात्यासाठी, प्रफुल्ल पटेल यांचा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या समितीत समावेश करण्यात आला आहे. तसेच जया बच्चन यांचा परराष्ट्र व्यवहार समितीत आणि मनीष तिवारी यांचा संरक्षण व्यवहार समितीत कनिमोळी यांच्यासह परराष्ट्र व्यवहार समितीत समावेश करण्यात आला आहे.

(हेही वाचा ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दिवाळी अंक आला; Raj Thackeray यांच्या हस्ते प्रकाशन)

2024-25 या वर्षासाठी विभाग-संबंधित संसदीय स्थायी समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये काँग्रेस सदस्यांना परराष्ट्र व्यवहारांसह चार प्रमुख समित्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. प्रत्येक समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदस्यांचा समावेश असतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.