लोकसभेत सोमवार, १ जुलै रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) चर्चेला सुरुवात करत संविधानाच्या नावाखाली मोदी सरकारवर टीका केली. त्यावेळी हातात संविधानाची प्रत हातात घेऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी राहुल गांधी यांनी स्वतःला हिंदू म्हणवणारे 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष पसरवतात, तुम्ही मुळीच हिंदू नाही. सत्याचे समर्थन करावे असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर आक्षेप घेत राहुल गांधी यांचा निषेध करत समज दिली.
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, ‘मोदीजींनी एके दिवशी आपल्या भाषणात सांगितले की, भारताने कधीही कोणावरही हल्ला केला नाही. त्याला कारण आहे. भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी हा संदेश दिला, घाबरू नका, घाबरू नका. शिवजी म्हणतात, घाबरू नका, घाबरवू नका आणि त्रिशूळ जमिनीत गाडतात. दुसरीकडे, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेष पसरवतात. तुम्ही मुळीच हिंदू नाही. सत्याचे समर्थन करावे असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे. त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, हा विषय अत्यंत गंभीर आहे. सगळ्या हिंदू समाजाला हिंसक म्हणणे चुकीचे आहे.
गृहमंत्र्यांकडून निषेध
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. पंतप्रधान मोदी तडक उभे राहिले आणि त्यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावर राहुल गांधी म्हणाले की, पीएम मोदी आणि भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याने आपल्या बोलण्याबद्दल माफी मागावी. करोडो लोक या धर्माला अभिमानाने हिंदू म्हणतात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इस्लाममधील अभय मुद्रेवर इस्लामिक विद्वानांचे मत घ्यावे. देशातील करोडो हिंदू हिंसक आहेत, असे राहुल (Rahul Gandhi) यांना म्हणायचे आहे का? विरोधी पक्षनेते माफी मागणार का?, असा सवालही शहा यांनी केला. हिंसाचाराचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे आहे. राहुल यांनी देशाची माफी मागावी, असेही अमित शहा पुढे म्हणाले.
अमित शहांनी आणीबाणीची आठवण करून दिली
अमित शाह म्हणाले, ‘इस्लाममधील अभय मुद्रा यावर इस्लामच्या विद्वानांचे मत घ्या, गुरू नानकजींच्या अभय मुद्रावर एसजीपीसीचे मत घ्या. त्यांना बेधडक बोलण्याचा अधिकार नाही, त्यांनी आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशाला घाबरवले होते, आणीबाणीच्या काळात वैचारिक दहशत होती. दिल्लीत दिवसाढवळ्या हजारो शीख बांधवांची हत्या करण्यात आली. ते अभय मुद्राबद्दल बोलत आहे. विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या पहिल्या भाषणात सभागृहासह संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.
Join Our WhatsApp Community