महाराष्ट्रात सध्या निवडणुकीची जोरदार धामधूम सुरु दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे प्रचारसभेत भाषणे करताना संविधानाच्या नावावर लाल पुस्तक दाखवत असल्याने चांगलेच वादात सापडले आहेत. आता यावर स्पष्टीकरण देणेही त्यांना चांगलेच महागात पडले आहे. 14 नोव्हेंबर रोजी राहुल गांधींनी नंदुरबारमध्ये सभेत संविधान दाखवले, त्यानंतर जो वाद झाला त्यावर त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा दिखावा केला. कारण जे संविधान म्हणून राहुल गांधी पुस्तक दाखवत होते, ते आतमध्ये कोरे होते. त्यावर राहुल गांधी यांनी, भाजपा नेते जे संविधानाचे पुस्तक कोरे असल्याचे सांगत आहेत, ते त्यांनी वाचलेले नाही. पुस्तकाच्या रंगाने काय फरक पडतो? राज्यघटनेत लिहिलेले तथ्य महत्त्वाचे आहे.
संविधानाच्या नावावर लाल पुस्तक दाखवून खुद्द राहुल गांधी यांनी संविधानाची कुचेष्टा केली आहे. भाजपाने त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आता राहुल गांधींच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी हे राजकारणात गंभीर नाहीत, हे सिद्ध करण्यात भाजपा नेत्यांना पुन्हा एकदा यश आले आहे. झारखंड (दुसरा टप्पा) आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी केवळ काही दिवस शिल्लक असताना, राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) या भूमिकेचा पक्षाच्या निकालांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
मोदी आणि शाह यांचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापासून ते अनुराग सिंह ठाकूरपर्यंत सर्वांनी राहुल गांधींच्या या कृतीला बालिश म्हटले आहे. या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला असून ते संविधानाच्या नावाने लाल रंगाची पुस्तके वाटत असल्याचे म्हटले आहे. हा संविधानाचा अपमान आहे. गैर-भाजपा सरकार सत्तेवर आल्यास काँग्रेस मागासवर्गीय आणि दलितांचा कोटा मुस्लिमांमध्ये वाटून देईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करत आहेत.
(हेही वाचा BKC Underground Metro Station: मुंबई बीकेसीतील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; मेट्रो-३ च्या फेऱ्या रद्द)
काय म्हणाले अमित शाह?
अमित शाह म्हणाले की, राहुल गांधी (Rahul Gandhi) बनावट संविधानाचे पुस्तक वाटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत आहेत. काँग्रेस ही आरक्षण आणि राज्यघटनेबद्दल बोलत आहे, पण राज्यघटनेशी सर्वात जास्त प्रतारणा करत आहे, असेही शाह म्हणाले. घटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही, मात्र मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण मिळण्यास मदत होईल, असे आश्वासन काँग्रेसने महाराष्ट्रातील उलेमाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. काँग्रेसला दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी यांच्या वाट्याचे आरक्षण मुस्लिमांना द्यायचे आहे, असेही शाह म्हणाले.
फडणवीसांवर निशाणा साधला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाचे संविधान आहे, तर भारतीय राज्यघटना निळ्या रंगाची आहे, ते प्रत्येक सभेत त्यांच्या हातात लाल रंगाचे संविधान दाखवत आहेत. अराजकतावादी आणि शहरी नक्षलवादी सभांमध्ये त्यांच्यासोबत बसतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) टोकाच्या डाव्या विचारांकडे झुकत असल्याचे हे द्योतक आहे.
हे संविधान नसून नोटपॅड : विजय वडेट्टीवार यांची कबुली
भारतीय जनता पक्षाच्या हल्ल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) खूपच नाराज दिसत आहेत, कारण यावेळी त्यांच्या बचावासाठी पक्षाचा कोणताही नेता पुढे आला नाही. उलट महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांनी नागपुरातील संविधान सन्मान परिषदेत लाल रंगाचे संविधान दाखवले, ते नोटपॅड असल्याचा खुलासा केला होता. संविधान सन्मान सभेला येणाऱ्या मान्यवरांना नोटपॅड आणि पेन दिले गेले. याचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community