केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू (Ravneet Singh Bittu) हे कायम लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हेटाळणी करत असतात. याआधी त्यांनी राहुल गांधी यांना ‘नंबर वन टेररिस्ट’ म्हटले होते. आता त्यांनी राहुल गांधी हे काँग्रेसचे माजी प्रमुख ‘पप्पू’ राहिले आहेत, अशा शब्दांत हेटाळणी केली आहे.
मंत्री बिट्टू (Ravneet Singh Bittu) म्हणाले की, त्यांनी (काँग्रेस) त्यांना (गांधी) विरोधी पक्षनेते (लोकसभेत) केले. पण तरीही ‘पप्पू’ ‘पप्पू’च राहतो. मल्लिकार्जुन खर्गे यांनी इतरांना उपदेश करण्यापेक्षा त्यांनी ‘पप्पू’ ला शिकवावे, असेही ते म्हणाले. राहुल गांधी हे नुकतेच तीन दिवसीय अमेरिकेला भेट दिली, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा पहिला परदेश दौरा आणि त्यांनी अनेक टिप्पण्या केल्या ज्यामुळे भारतात वाद निर्माण झाला. अशाच एका कमेंटमध्ये रायबरेलीच्या खासदाराने शीख समाजावर भाष्य केले.
(हेही वाचा Bangladesh मध्ये हिंदू असुरक्षितच; ऑगस्ट महिन्यात 15 दिवसांत हिंदूंवर हजाराहून अधिक ठिकाणांवर हल्ले)
काय होते राहुल गांधी यांचे वक्तव्य?
राहुल गांधी यांनी व्हर्जिनिया येथे एका कार्यक्रमात सांगितले की, “भारतात शीखांना पगडी घालण्याची परवानगी दिली जाईल की नाही; किंवा शीखांना भारतात कडा घालण्याची परवानगी दिली जाईल की नाही; किंवा शीखांना पगडी घालण्याची परवानगी द्यायची की नाही यावर लढा आहे.
बिट्टू यांची आक्रमक प्रतिक्रीया
मार्चमध्ये काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले बिट्टू (Ravneet Singh Bittu) म्हणाले, “जर बॉम्ब बनवणारे त्यांना (गांधी) पाठिंबा देत असतील, तर तो नंबर एकचा दहशतवादी आहे. त्याला आपल्या देशावर फारसे प्रेम नाही कारण त्याला परदेशी आवडतात. ते विदेशात जातात आणि सर्वकाही चुकीच्या पद्धतीने बोलतात.” अमेरिकास्थित खलिस्तान समर्थक संघटना, शीख फॉर जस्टिस (SFJ) ने गांधींच्या विधानाचे समर्थन केले आहे.
Join Our WhatsApp Community