काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती २० कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे. मात्र असे असूनही राहुल गांधी बेघर आहेत आणि त्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही.
२०१९ आणि २०२४मध्येही राहुल गांधी बेघरच
२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जे संपत्तीचे विवरण दिले होते. त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचे घर नाही आणि स्वतःचे वाहन नाही, असे नमूद केले होते. २०२४च्या निवडणुकीच्या वेळीही राहुल गांधी स्वतःला बेघर दाखवत आहेत आणि दुसऱ्यांच्या वाहनाने ते आपला प्रवास करत आहेत. कारण त्यांच्याकडे स्वतःचे वाहनदेखील नाही, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नमूद केले आहे. त्यांची स्थावर मालमत्ता ११ कोटी ५५ लाख रुपये आहे, तर जंगम मालमत्ता ९ कोटी २४ लाख रुपये आहे. याचा अर्थ राहुल गांधी यांची एकूण मालमत्ता २० कोटी रुपये आहे.
आदित्य ठाकरेंकडे स्वतःचे घर
स्वतःचे घर नसलेले बेघर, स्वतःच्या मालकीचे वाहन नसलेले राहुल गांधी उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा २ कोटी रुपयांनी श्रीमंत आहेत, हे मात्र इथे आवर्जून नमूद करावे लागेल. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे घर आहे, ६ लाख ५० हजार रुपयांची गाडी आहे, तरीही आदित्य ठाकरे यांची एकूण संपत्ती १७ कोटी ६९ लाख इतकीच आहे. यावरून आदित्य ठाकरेंपेक्षा राहुल गांधी काहीही नसताना श्रीमंत दिसत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या संपत्तीपैकी ८ कोटीहून अधिक रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवले आहेत.
Join Our WhatsApp Community