लाल संविधान नाही नोटपॅड, खुद्द काँग्रेस नेत्याने केली Rahul Gandhi यांच्या नॅरेटिव्हची पोलखोल

120
लाल संविधान नाही नोटपॅड, खुद्द काँग्रेस नेत्याने केली Rahul Gandhi यांच्या नॅरेटिव्हची पोलखोल
लाल संविधान नाही नोटपॅड, खुद्द काँग्रेस नेत्याने केली Rahul Gandhi यांच्या नॅरेटिव्हची पोलखोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नागपूरमधील संविधान सन्मान संमेलनात लाल रंगाची संविधान पुस्तिका दाखवली होती. त्यानंतर या लाल पुस्तकाबद्दल बरीच चर्चा झाली. मात्र आता या लाल पुस्तिकेबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण देत राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) लाल पुस्तिका दाखवून संविधानाचा केलेला अपमान उघड झाला आहे.

( हेही वाचा : Amit Shah म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा महाराष्ट्रात आणायचे…’

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राहुलजी गांधींच्या (Rahul Gandhi)नागपूरातील आजच्या दौऱ्याचा भाजपने इतका धसका का घेतला?संविधान सन्मान संमेलनात आलेल्या मान्यवरांना नोटपॅड, पेन दिले जाते. याच नोटपॅडचे व्हिडिओ बनवून थिल्लर आरोप करणे ह्यात दूरपर्यंत बुद्धीचा वापर दिसत नाही!, असे विधान वडेट्टीवार यांनी केले. त्यामुळे राहुल गांधींच्या हातातील लाल पुस्तक हे नोटपॅड असल्याचे खुद्द काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ज्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) संविधानाचा अपमान करत असल्याची टीका त्यांच्यावर राजकीय वर्तुळात होत आहे.

याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हातात लाल रंगाचे संविधान आहे. भारतीय संविधान निळ्या रंगाचे असताना ते प्रत्येक सभांमधून आपल्या हातात लाल रंगाचे संविधान लोकांना दाखवत असतात. सभेत त्यांच्या आजूबाजूला अराजकवादी आणि शहरी नक्षलवादी बसलेले असतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) कट्टर डाव्या विचारांकडे झुकलेले आहेत, याचेच हे निदर्शक आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.