राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा न्यायालयाने दणका दिला आहे. गुजरात हायकोर्टानं राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. मोदी आडनावाबद्दल केलेल्या विधानावरून राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. यावर पुर्नविचार करणारी याचिका दाखल करत राहुल गांधींनी गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. पण, ही याचिका आज म्हणजेच शुक्रवार (७ जुलै) गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राहुल गांधीसांठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचारादरम्यान ‘मोदी आडनावाचे सर्व चोर आहेत’ असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. याप्रकरणी भाजपा नेते पूर्वेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात सुरत येथील सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या सर्व लोकांची बदनामी केल्याचा आरोप पूर्वेश मोदी यांनी केला होता. याप्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयानं दोषी ठरवून २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता गुजरात हायकोर्टाने ती शिक्षा कायम ठेवली आहे.
(हेही वाचा – ठाकरे गटाला पुन्हा धक्का; विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे करणार शिवसेनेत प्रवेश)
आता काय करणार राहुल गांधी?
राहुल गांधींकडे सध्या दोन पर्याय आहेत. राहुल गांधी हायकोर्टाच्या मोठ्या घटनापीठाकडे जाऊ शकतात किंवा थेट ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. राहुल गांधींचे खासदार म्हणून निलंबन देखील कायम राहणार आहे. जोपर्यंत स्थगिती मिळत नाही तोपर्यंत त्यांना खासदारकी मिळणे अवघड आहे. अशातच संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी काँग्रेस काय हालचाली करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
येत्या २३ जुलैला राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होऊन चार महिने पूर्ण होतील. तसेच येणाऱ्या वायनाडच्या पोटनिवडणुकीबाबत काय होणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community