कर्नाटक निवडणुकीसाठी राहुल यांचे ‘व्हिक्टीम-कार्ड’ – रविशंकर प्रसाद

70

कर्नाटक विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राहुल गांधींनी स्वतःला शिक्षा करवून घेतल्याचा गंभीर आरोप भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केलाय. राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ते बोलत होते. राहुल गांधी ‘व्हिक्टीम-कार्ड’ खेळत असल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय.

यासंदर्भात रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल यांच्यावर मानहानीचे ६० खटले सुरू आहेत. राहुल यांनी जाणूनबुजून अशी कामे केली, त्यांनी मागासवर्गीयांचा अपमान केल्याचे भाजपचे मत आहे. राहुल यांच्या वक्तव्याविरोधात भाजप संपूर्ण देशात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधींविरुद्ध सुरतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडे बड्या वकिलांची फौज आहे. राज्यसभा आणि लोकसभेत मोठे वकील आहेत. राहुल गांधींच्या प्रकरणात ते सुरत कोर्टात का गेले नाहीत? हे वकिल पवन खेडा प्रकरणी कोर्टात जाऊ शकतात मग राहुल गांधींच्या वेळी का नाही? असा सवाल प्रसाद यांनी उपस्थित केला.

देशात असा कायदा आहे की, दोन वर्षांची शिक्षा झाल्यास तुम्हाला तत्काळ अपात्र ठरवले जाईल. असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने राहुलच्या प्रकरणात स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. नखे कापून हुतात्मा होण्याचा हा प्रयत्न आहे का? असा सवालही त्यांनी विचारला. हा सगळा भाग म्हणजे राहुल यांना त्यागाचे चित्रण करून कर्नाटक निवडणुकीत त्याचा फायदा उठवण्याची सुनियोजित रणनीती आहे. राहुल यांना पिडीत दाखवा आणि काँग्रेसला वाचवा. याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल. तुम्हाला दोषी ठरवल्यानंतर वकिलांच्या फौजेने तुम्हाला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न का केला नाही? देशात प्रत्येकासाठी एकच कायदा असेल तर तुमच्यासाठी वेगळा कायदा असेल का ?

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल आज पुन्हा एकदा खोटे बोलले. मी लंडनमध्ये काहीही चुकीचे बोललो नाही, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल यांचे राजकारण अगदी सरळ आहे. आपण जिंकलो तर लोकशाही ठीक आणि हरलो तर वाईट आहे. जर आपण जिंकलो, तर निवडणूक आयोग बरा, आणि हरलो तर निवडणूक आयोग चुकीचा आहे, आमच्या बाजूने निर्णय आला तर न्यायालय बरोबर आहे, आमच्या बाजूने नाही आले तर न्यायालय वाईट आहे, असा त्यांचा समज असल्याचा टोला प्रसाद यांनी यावेळी लगावला.

(हेही वाचा – वीर सावरकरांवरील विधानावरून मुख्यमंत्री संतापले; म्हणाले, राहुल गांधींना अर्धा-एक तासासाठी कोलूवर जुंपलं पाहिजे म्हणजे…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.