-
प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्याचा जबरदस्त धक्का राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बसला आहे. याचा राहुल गांधी यांच्या मनावर परिणाम झाला असून शुक्रवारी पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा जुना आकडा सांगून युवराजांनी आता केंद्रीय निवडणूक आयोगाला वादात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांची संख्या ही एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याचा साक्षात्कार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना झाला आहे.
महाराष्ट्रमध्ये भाजपाला मिळालेल्या प्रचंड बहुमताने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अनेकदा प्रश्न उपस्थित करीत असतात. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालांवर हा प्रश्न उपस्थित केला आहे की, महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त कशी? असा प्रश्न गांधी यांनी विचारला आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालांवर हा प्रश्न उपस्थित केला आणि निवडणूक आयोगाने उत्तर दिले की ज्येष्ठ मतदारांची संख्या जास्त कशी? या यादीबद्दल निवडणूक आयोगाने सविस्तर उत्तर दिले आहे.
(हेही वाचा – Mumbai Crime : मुंबई एनसीबीची मोठी कारवाई ! 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, विदेशी रॅकेट आलं समोर)
पुन्हा राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला घेरले
कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी दावा केला आहे की, गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गोंधळ झाला आहे. कॉंग्रेसच्या खासदारांनी मतदारांच्या यादीवर गडबड केल्याचा आरोप केला आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सात लाख मतदारांना जोडले गेले, असा दावा त्यांनी केला. निवडणुकीच्या अगोदर राज्यात बरेच लोकं कोठून आले?, असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्यांनी निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, “महाराष्ट्राच्या मतदारांच्या यादीतील गडबड गंभीर अनियमितता प्रतिबिंबित करते. मतदारसंघांमधील भाजपाचा विजय फरक मतदारांच्या यादीतील फरकइतकीच आहे.” असा दावा गांधी यांनी केला आहे.
(हेही वाचा – Ind vs Eng, 1st ODI : हर्षितचा पदार्पणातच अनोखा विक्रम, तीनही पदार्पणात ३ बळी मिळवणारा पहिला भारतीय)
संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले
निवडणूक आयोगावर आरोप करताना पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत म्हणाले, “जर देशातील निवडणूक आयोग ‘जिवंत’ असेल तर त्यांनी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) काय विचारले आहे ते उत्तर द्यावे. परंतु, निवडणूक आयोग करणार नाही. निवडणूक आयोगाला सरकारचा गुलाम झाला आहे.
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
त्याच वेळी, निवडणूक आयोगाने देखील राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) आरोपांना प्रतिसाद दिला आहे. त्यांनी लेखी प्रतिसाद देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की मतदारांच्या यादीसंदर्भात देशभरात अशीच प्रक्रिया आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community