देशात राष्ट्रीय दुखवटा; मात्र Rahul Gandhi परदेशात नववर्ष साजरे करणार

151
देशात राष्ट्रीय दुखवटा; मात्र Rahul Gandhi परदेशात नववर्ष साजरे करणार
  • प्रतिनिधी 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यामुळे सर्वच राजकीय आणि सरकारी कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहे. मात्र विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नववर्ष साजरे करण्यासाठी परदेशात रवाना झाले आहे. यामुळे भाजपाकडून त्यांच्यावर प्रखर शब्दात टीका करण्यात येत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल केंद्राने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. काँग्रेसने देखील ३ जानेवारीपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तरीही राहुल गांधी परदेशात गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच यमुनेच्या काठावर अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यात आली नाही, यावरून आधीच भाजपा आणि काँग्रेस मध्ये राजकारण सुरु आहे.

तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर देशभरात शोक व्यक्त होत असताना काँग्रेसचे खासदार नववर्ष साजरे करण्यासाठी व्हिएतनामला गेले, असा दावा करत भाजपाने राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार हल्ला चढवला. 26 डिसेंबर रोजी निधन झालेल्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळला जात आहे, या दरम्यान देशभरात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकणार आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने भाजपाच्या आरोपावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, राहुल गांधी खाजगी परदेश दौऱ्यावर गेले आहेत आणि कोणाच्याही गोपनीयतेशी संबंधित बाबींवर कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये.

(हेही वाचा – ‘थर्टी फस्ट’च्या पार्टीसाठी पुण्यातील पबकडून Condom च्या पाकिटांचे वाटप)

तर सोमवारी राजकीय वादावर बोलताना भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, “जेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देश शोक करत आहे, त्यावेळी राहुल गांधींना (Rahul Gandhi) परदेशात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जाणे लज्जास्पद आहे. काँग्रेस खासदार सुखजिंदर सिंग रंधवा म्हणाले की, भाजपा फक्त खोटे बोलत आहे. ती प्रत्येक गोष्टीवर खोटे बोलते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधण्यासाठी जागा दिली नाही, असा आरोप पक्षाच्या खासदाराने केला. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाला राहुल गांधींनी खांदा दिला… आणि भाजपा त्यांच्यावर आरोप करत आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाने राजकारण केल्याबद्दल पक्षाला लाज वाटली पाहिजे, त्यांनी माफी मागावी, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर माजी पंतप्रधानांच्या मृत्यूचे राजकारण केल्याचा आरोप करत मालवीय म्हणाले, “गांधी कुटुंब आणि काँग्रेस शीखांचा द्वेष करतात. इंदिरा गांधींनी दरबार साहिबचा अपमान केला होता हे कधीही विसरू नका. याच्या एक दिवस आधी, भाजपाने काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबावर टीका केली होती आणि शनिवारी दिल्लीतील यमुना नदीत विसर्जित करण्यात आलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी न आल्याचा आरोप केला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.