राहुल गांधींनी तोडले अकलेचे तारे; चीनचे कौतुक आणि काश्मीरबाबतही केले चुकीचे विधान

175

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात बोलताना चीनचे कौतुक केले. चीन हा शांततेचा देश आहे. अनेक उदाहरणांद्वारे त्यांनी आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चीनच्या रणनीतीचाही उल्लेख केला. तसेच, चीनने केलेल्या विकासाबद्दल आणि पाश्चिमात्य देशांच्या विचारसरणीवरही भाष्य केले. चीनमध्ये तुम्हाला ज्या प्रकारची पायाभूत सुविधा (रेल्वे, विमानतळ) दिसते, ती सर्व निसर्गाशी, नदीच्या शक्तीशी जोडलेली आहे. चीनचे निसर्गाशी घट्ट नाते आहे. तर राहुल यांनी भाषणात पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख केला. त्यांनी जम्मू-काश्मीरला तथाकथित हिंसक ठिकाण म्हटले.

अमेरिकेचा विचार केला तर तो स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजतो. चीनला शांततेत किती रस आहे हे सांगण्यासाठी हे पुरेसे आहे. तेथील सरकार एखाद्या कॉर्पोरेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर सरकारचे पूर्ण नियंत्रण असते. सध्या भारत आणि अमेरिकेत अशी परिस्थिती नाही. त्यामुळेच चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत मोठी प्रगती केली आहे, असेही राहुल म्हणाले. राहुल यांनी आपल्या भाषणात पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख केला. त्यांनी जम्मू-काश्मीरला तथाकथित हिंसक ठिकाण म्हटले. काश्मीर हे बंडखोरी प्रवण राज्य आहे आणि तथाकथित हिंसक ठिकाण आहे. ज्या ठिकाणी आमचे 40 जवान शहीद झाले, त्या ठिकाणीही मी गेलो होतो. दरम्यान, केंब्रिज विद्यापीठात राहुल यांनी दिलेली इतर अनेक विधानेही चर्चेचा विषय बनली आहेत. पेगाससबाबतही त्यांनी आपले मत मांडले आहे. केंब्रिजमध्ये राहुल गांधीनी केले. भारतात लोकशाही धोक्यात असल्याचे राहुल म्हणाले.

(हेही वाचा परीक्षेला हिजाब घालून बसण्यास परवानगी देण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.