राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरुवातीपासून कोणत्या ना कोणत्या वादात सापडलेले आहे. या यात्रेतून राहुल गांधी यांनी केरळमध्ये पाद्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हिंदू धर्माला कमी लेखण्यात आले. महाराष्ट्रात येऊन त्यांनी वीर सावरकर यांचा अवमान केला, आता राजस्थानात जाऊन राहुल गांधी यांनी हिंदी द्वेष दाखवून दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी, १९ डिसेंबर रोजी अलवर जिल्ह्यात दाखल झाली. सकाळी नऊच्या सुमारास ही यात्राधानीमध्ये दाखल झाली. जिथे जिल्ह्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेचे स्वागत केले. अलवर जिल्ह्यात ही यात्रा तीन दिवस राहणार आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांनी हिंदी भाषा द्वेष प्रकट केला.
(हेही वाचा Savarkar’s portrait unveiled in Karnataka Assembly : काँग्रेसला कर्नाटक विधानसभा संसदेपेक्षा मोठी वाटते का?)
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत भाषण करताना राजस्थानात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याच्या योजनेचे कौतुक केले. राजस्थानमधील प्रत्येक मुलाला इंग्रजीमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी, असे सांगत भाजपच्या सर्व नेत्यांचे खासदार, आमदार आणि मुख्यमंत्र्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊन इंग्रजी शिकत नाहीत अशी भाषणे देतात मात्र गरीब मजुरांच्या मुलांनी इंग्रजी शिकावे असे त्यांना वाटत नाही का? तुम्ही मोठी स्वप्ने पाहावीत असे त्यांना वाटत नाही का? भारतातील सर्व भाषांचा अभ्यास झाला पाहिजे, पण अमेरिका आणि इतर देशांत बोलण्यासाठी हिंदीचा उपयोग होणार नाही, फक्त इंग्रजीचा उपयोग होईल. गरिबांच्या मुलाने इंग्रजी शिकून अमेरिकेतील तरुणांवर इंग्रजी भाषेने मात द्यावी. राजस्थानमध्ये 1700 इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या असून दहा हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र हे प्रमाण कमी आहे. राजस्थानच्या प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकण्याची संधी मिळाली पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.
Join Our WhatsApp Community