Rahul Gandhi : आमचे सरकार येताच अग्निवीर योजना बंद करणार; राहुल गांधी यांची घोषणा

चंद्रपूर आणि नागपुरच्या कन्हान येथे पंतप्रधानांच्या दोन भव्य सभा पार पडल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे देखील मैदानात उतरले आहेत.

216
महाराष्ट्र काँग्रेस हरियाणाच्या वाटेवर; Rahul Gandhi राज्यातील नेत्यांवर नाराज
आमचे सरकार आल्यावर सर्वात आधी आम्ही अग्निवीर ही योजना बंद करणार. सैन्यातील हुतात्म्यांना सरकार पेन्शन देते, पण दुसरा हुतात्मा अग्नीविर याला पेन्शन देत नाही. मुळात ही योजना सैन्यात बनलीच नाही. ती मोदींच्या कार्यालयात तयार झाली अन् लष्करावर थोपवली गेली. म्हणून ही योजना आमचे सरकार आल्यावर बंद करेल, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली.
पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील पाच मतदारसंघाच्या मतदानासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. नुकतेच चंद्रपूर आणि नागपुरच्या कन्हान येथे पंतप्रधानांच्या दोन भव्य सभा पार पडल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील मैदानात उतरले आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे राहुल गांधी यांची शनिवार, १३ एप्रिल रोजी सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप सरकारच्या नीतींवर जोरदार हल्लाबोल केला.
गेल्या १० वर्षात मोदी यांनी काही निवडक करोडपती उद्योगपती अदानी यांच्यासाठी सरकार चालवले. मोदी यांचे सरकार आले तर अदानी यांच्या शेअरचे भाव वाढतात. हे अदानीचे सरकार आहे, असा हल्लाबोल त्यांनी मोदी सरकारवर केला. आम्ही खोटे बोलणार नाही. उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते. मग देशातील गरीब, गरजू जनतेचे कर्ज माफ कर्जमाफ केले जाईल, अशी घोषणा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली.

पेपर लीकवर कडक कायदा करणार

पेपर लीकवर कडक शासन तयार केले जाईल. कोणतीही प्रायव्हेट कंपनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार नाही. सरकारी नोकरी सरकारच्या अधिकाऱ्यामार्फत घेतली जाईल, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. आम्ही तयार केलेला जाहीरनामा हा लोकांच्या हिताचा आहे, आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करणार. प्रत्येक घरातील महिलेची निवड करून तिच्या खात्यात एक लाख टाकणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. प्रत्येक महिन्याच्या खात्यात 1 तारखेला साडे आठ हजार म्हणजे वर्षाला 1 लाख रुपये दिले जातील. 22 लोकांना 16 लाख कोटी रुपये दिले आहेत. म्हणजे 24 वर्षाच्या मनरेगाचा जेवढा पैसा आहे. तेवढा पैसा उद्योगपतींना दिला. म्हणून आम्ही लोकांना व गरजूंना मदत केली जाणार आहे, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणतात की, मी ओबीसी आहे. मग देशातील सर्वात मोठ्या संस्थांमध्ये किंवा प्रायव्हेट संस्थामध्ये ओबीसींचे प्रतिनिधीत्व किती आहे. देशाचे सरकार दिल्लीत बसून 90 अधिकारी चालवतात. त्यात ओबीसी, मागासवर्गीयांचे प्रतिनिधीत्व किती आहे. 90 लोकांमध्ये तीन नाव ओबीसी, एक दलित, एक मुस्लिम बाकी सर्व लोक दुसरे आहेत. मग ओबीसींसाठी तुम्ही काय केले, कोणती योजना आणली ते आधी सांगा?, असेही राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.