मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. मुस्लिम लीगच्या बाबतीत गैर-धर्मनिरपेक्ष असे काहीही नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केले आहे. ते वॉशिंग्टन डीसी येथे नॅशनल प्रेस क्लबमध्ये केरळमध्ये काॅंग्रेसची इंडियन युनियन मुस्लिम लीगसोबत आघाडी आहे, याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले.
राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर असून तेथे विविध ठिकाणी करत असलेल्या वक्तव्यांमुळे ते सध्या चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या या विधानामुळे भारतातील राजकीय वातावरण तापले आहे. मुस्लिम लीगला सेक्युलर घोषित केल्यानंतर भाजपने त्यांच्या या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी वायनाडमध्ये स्वतःची स्वीकारार्हता टिकवून ठेवण्यासाठी राहुल गांधी यांनी अपरिहार्यतेतून मुस्लिम लीगला धर्मनिरपेक्ष म्हटले आहे.
(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून शिवराज्याभिषेक दिनाच्या दिल्या शुभेच्छा; म्हणाले…)
भारतातील प्रेस फ्रीडम कमकुवत
दरम्यान राहुल गांधी यांनी असेही म्हटले आहे की, भारतातील प्रेस फ्रीडम कमकुवत होत आहे, हे कोणापासूनही लपलेले नाही आणि हे सर्वच जण जाणतात. लोकशाहीसाठी प्रेस फ्रीडम अत्यंत महत्वाचे आहे आणि टीकाही ऐकली जायला हवी.
संस्थात्मक गोष्टीही नियंत्रित
पुढे ते असेही म्हणाले की, संस्थात्मक गोष्टीही नियंत्रित केल्या जात आहेत. आपण हा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारायला हवा. हे आपण कसे कराल, मला माहित नाही. मात्र आपण विचारायला हवे. भारताकडे अत्यंत मजबूत व्यवस्था आहेत, ज्या पूर्वीपेक्षाही मजबूत आहेत. ती व्यवस्था कमकुवत झाली आहे. जर लोकशाही व्यवस्थेला प्रोत्साहन दिले गेले, तर हे मुद्दे आपोआपच सुटतील. आपल्याकडे संस्थांचा एक स्वतंत्र गट असायला हवा, जो प्रेशर आणि कंट्रोलमध्ये नसावा. काँग्रेस पक्ष एक अशी संस्था आहे, जिने संस्थांची संकल्पना मांडली. आम्ही त्यांच्याकडे आमच्या संस्था म्हणून पाहत नाही, तर राज्यांच्या संस्था म्हणून पाहतो. या संस्था स्वतंत्र आणि तटस्थता असाव्यात, हे आम्ही निश्चित केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community