काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा टीजर १५ मार्च रोजी प्रसारित झाला आहे. या टीजरमध्ये काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) घोर अपमान केला आहे. काँग्रेसने (Congress) या टीजरमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे प्रोजेक्ट केले आहे.
मुंबई येथील शिवाजी पार्क येथे होणार असलेल्या राहुल गांधींच्या सभेची जाहिरात करण्यात आली आहे. या जाहिरातीत श्रेष्ठ कवी भूषण यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करण्यासाठी लिहिलेल्या ‘इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं’, या गीताच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींना दाखवत ते जणूकाही छत्रपतींचा आधुनिक अवतार आहेत, असे दाखवले आहे.
(हेही वाचा – Action by ED: दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीची कारवाई, बीआरएसच्या महिला नेत्याला अटक)
जवाहरलाल नेहरू यांनीही केला होता छत्रपतींचा अपमान
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची ही काँग्रेसची पहिलीच वेळ नसून यापूर्वी जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांनीही महाराजांचा घोर अपमान केला होता. त्या वेळी पंतप्रधानपदी असलेले जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांना ‘वाट चुकलेला देशभक्त’, ‘लुटारू’ अशी विशेषणे लावून त्यांचा अपमान केला होता. या वेळी त्यांचे पणतू राहुल गांधी यांनी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रोजेक्ट करत केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर हिंदुस्थानच्या राष्ट्रीय अस्मितेचा घोर अपमान केला आहे.
या तमाशामुळे समस्त शिवप्रेमी अत्यंत संतप्त झाले आहेत. ‘संपूर्ण भारताचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र (Maharashtra) कधीही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागून हा व्हिडिओ काँग्रेसने तात्काळ मागे घ्यावा’, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
…तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही – सुनील पवार यांचा इशारा
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे त्यांच्या पापाचा घडा भरला असून त्यांनी हा व्हिडिओ मागे घेऊन छत्रपतींची आणि राष्ट्रभक्तांची माफी मागितली नाही, तर त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा किल्ले रायगड शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष आणि मराठा महासंघ मुंबईचे माजी अध्यक्ष सुनील पवार यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट‘शी बोलताना दिला आहे. (Rahul Gandhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community