राहुल गांधींचे चीन प्रेम; नेटकरी घेतायेत खरपूस समाचार 

133

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली मात्र त्यात वादग्रस्त विधाने करून ती अधिकाधिक वादात आणली. त्यानंतर राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात भाषण द्यायला गेले, तिथे त्यांनी भारताची निंदानालस्ती केली. चीनची स्तुती केली. याचे तीव्र पडसाद देशात राजकारणात उमटलेच आता ते सोशल मीडियातही उमटू लागले आहेत. राहुल गांधींना पंतप्रधान बनवले तर देश चीनच्या पायाशी ठेवतील, असा इशारा नेटकरी देत आहेत.

काय म्हणाले होते राहुल गांधी? 

भारतात लोकशाही संपुष्टात येत आहे. देशात अल्पसंख्यकांवर हल्ले होत आहेत. याउलट चीनने त्याच्या अवतीभवती सर्व संघटनांना सोबत घेऊन सद्भावना वाढवण्याचा प्रयत्न केला, असे राहुल गांधी म्हणाले.

(हेही वाचा तुर्कीने काश्मीर मुद्यावरून भारताला केले लक्ष्य; सोशल मीडियात संताप, काय म्हणतात नेटकरी?)

काय म्हणतात नेटकरी? 

यावर नेटकऱ्यांनी राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. काही जण म्हणतात की, जर राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर ते चीनसमोर शरणागती पत्करतील.

काही जणांनी तर राहुल गांधींचे कुळ आणि मूळ काढले, विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा कधी देशभक्त होऊ शकत नाही, असे चाणक्य यांनी म्हटले आहे, असे काहींनी म्हटले आहे.

काहींनी तर प्राणीही इमान राखतात, असे खोचकपणे म्हटले आहे.

त्याचवेळी इंदिरा गांधी यांच्या एका जुन्या मित्राने राहुल गांधी यांनी परदेशी भूमीवर देशाची बदनामी करायची नसते असे सुनावलेला व्हिडियो अपलोड केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.