छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज तथा भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राहुल गांधीवर (Rahul Gandhi) निशाणा साधला आहे. उदयनराजे भोसले हे त्यांच्या बिनधास्त आणि आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. तसेच कौतुक वा टीका त्यांच्या हटके स्टाइलने करताना कधीच मागचा पुढचा विचार करत नाहीत. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.
विरोधी बाकावर बसून कुरघोडी करणारे राहुल गांधी नेहमी चर्चेत असतात. खासदार गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्या सोशल मीडिया पेजवर केलेल्या आक्षेपार्ह लिखाणामुळे भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी राहुल गांधींवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
भाजपा (BJP MLA) खासदार उदयनराजे म्हणाले, राहुल गांधी अफू (Rahul Gandhi opium) घेऊन असे गलिच्छ लिखाण केले असावे. त्याला या देशात राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. अशी माणसे व त्यांचे समर्थन करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा तसेच या लोकांना वेचून ठेचले पाहिजे, अशी अपेक्षा सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
(हेही वाचा – BMC : महापालिका विधी खात्याची आयुक्तांनी ऐकून घेतली बाजू, दिले ‘हे’ निर्देश)
पुढे म्हणाले की, आक्षेपार्ह लिखाण करुन स्वतःला कोण समजतो. हा कुठं जन्माला आला आहे, याचे भान त्याला नाही. युगपुरुषांविषयी आदरपूर्वकच बोलले पाहिजे. मात्र, त्याच्याकडून अपमान झालेला आहे. त्याला इतिहासाची किती माहिती आहे, शिवाजी महाराजांविषयी माहिती आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, सातारा येथील त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी गुरुवारी ०७ ऑक्टोमबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधींचा (Rahul Gandhi) चांगलाच समाचार घेतला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community