- खास प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी ‘X’ वर एक पोस्ट करत एका दलिताच्या घरी जाऊन स्वयंपाकात मदत केली आणि त्याचा व्हिडिओ पोस्ट केला. दलित क्या खाते है, क्या पकाते है और इसका सामाजिक और राजनीतीक महत्व क्या क्या है, असे काही प्रश्न गांधी यांना ५५ व्या वर्षी पडले. त्यावरून सामान्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल केले तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर दलितांसोबत ९४ वर्षांपूर्वी सहभोजन आयोजित करीत असत, याची आठवण एका नेटकऱ्याने करून दिली.
अडीच मिनिटांचा व्हिडिओ
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर गांधी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अजय सनदे या दलित कुटुंबाला घरी जाऊन भेट दिली आणि दुपार त्यांच्यासोबत व्यतीत केली. सनदे यांच्या घरी काय काय केले यांचा अडीच मिनिटांचा व्हिडिओ बनवून त्यांनी तो ‘X’ पोस्ट केला आणि नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे गांधीना ट्रोल केले.
दलित किचन के बारे में आज भी बहुत कम लोग जानते हैं। जैसा शाहू पटोले जी ने कहा, “दलित क्या खाते हैं, कोई नहीं जानता।”
वो क्या खाते हैं, कैसे पकाते हैं, और इसका सामाजिक और राजनीतिक महत्व क्या है, इस जिज्ञासा के साथ, मैंने अजय तुकाराम सनदे जी और अंजना तुकाराम सनदे जी के साथ एक दोपहर… pic.twitter.com/yPjXUQt9te
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 7, 2024
(हेही वाचा – देशविघातक कृत्य केले म्हणत Imtiyaz Jaleel यांनी केले बाळासाहेब ठाकरेंनाच टार्गेट)
हरभऱ्याची भाजी आणि तूरडाळ
गँगही त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात की दलित किचनबाबत आजही खूप कमी लोकांना माहिती आहे. गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले की, “दलित काय खातात, काय स्वयंपाक करतात, त्याचे सामाजिक, राजकीय महत्त्व काय या जिज्ञासेपोटी मी अजय आणि अंजना सनदे यांच्यासोबत एक दुपार व्यतीत केली. त्यांनी सन्मानाने घरी बोलावून स्वयंपाकात मदत करण्याची संधी दिली. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हरभऱ्याची भाजी आणि वांगीसोबत तूर डाळ बनवली. दलित खाद्यपदार्थप्रती जागृततेची कमतरता आणि या संस्कृतिच्या डॉक्युमेंटेशन वर चर्चा केली.” वास्तविक हरभऱ्याची भाजी आणि तूरडाळ, वांगी हे फक्त दलित खातात, हीच मूळात दिशाभूल आहे.
सावरकर यांचे १९३० पासून दलितांसोबत सहभोजन
या गांधी (Rahul Gandhi) यांच्या पोस्ट वर एका प्राध्यापकाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आठवण करून दिली. ते म्हणाले, “राहुल गढी २०२४ मध्ये ५५ व्या वर्षी पहिल्यांदा दलितासोबत भोजन करत आहेत. विनायक दामोदर सावरकर १९३० पासून दलितांसोबत सहभोजण करीत आहे. यात सर्व जाती-धर्माचे लोक येतात. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हेदेखील एका सहभोजनात सहभागी झाले होते,’ याची आठवण करून दिली.
(हेही वाचा – IPO Earnings : ३८ आयपीओ मधून गुंतवणुकदारांना ६ महिन्यात मिळाला ४१ टक्के परतावा)
पक्का घर, बिजली, पानी और गैस
एकाने “मोदी सरकार में देश का बदलाव: राहुल गांधी खुद दिखा रहे हैं कि २००८ में कांग्रेस के समय गरीबों के पास कोई सुविधा नहीं थी। लेकिन आज, मोदी सरकार में गरीब दलित के पास पक्का घर, बिजली, पानी और गैस चूल्हा जैसी सभी बुनियादी सुविधाएं मौजूद हैं। ये है नए भारत का निर्माण।,” अशी पोस्ट करत एक पोस्टरसुद्धा टाकले आहे.
जाति के नाम पे समाज को बाटूँगा।
एकाने तर जातिभेदावर बोट ठेवत “अब जमाना बदल गया है और मैं धर्म के नाम पे नहीं, जाति के नाम पे लोगों को समाज को बाटूँगा। ये है मेरी निंजा टेक्नीक ~ आपका अपना राहुल गाँधी,” अशी खोचक पोस्ट टाकून एक पोस्टरही टाकेल आहे.
(हेही वाचा – काँग्रेसच्या Supriya Srinet यांना आता काय म्हणायचे; नेटकऱ्यांना पडला प्रश्न)
खून का रंग भी अलग बताया जाएगा
तर एकाने गांधी यांच्या जातीच्या राजकारणावर उद्विग्न होत, “ये लीजिए, अब दलित का खाना भी अलग हो गया!! कुछ दिन और रुकिए, दलित का खून भी लाल नही बल्कि अलग रंग का बताया जाएगा। उसके बाद दलित की भाषा और शरीर का आकार भी अलग बताया जाएगा। भारत अब मध्यकालीन भारत के समाज में वापिस जा रहा है।,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Rahul Gandhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community