संसदेत 29 जुलै रोजी चक्रव्यूह भाषणानंतर अंमलबजावणी संचालनालय (ED) त्यांच्या घरावर छापा टाकण्याची योजना आखत आहे, असा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. मी आतुरतेनं ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांची वाट पाहत आहे, असंही राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. ईडीच्या सूत्रांनीच यासंदर्भात माहिती दिल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
Apparently, 2 in 1 didn’t like my Chakravyuh speech. ED ‘insiders’ tell me a raid is being planned.
Waiting with open arms @dir_ed…..Chai and biscuits on me.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 1, 2024
ट्विटर पोस्टमध्ये राहुल गांधींनी ईडीच्या छाप्याबद्दल दावा केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “वरवर पाहता, माझं चक्रव्यूह भाषण दोघांपैकी एकाला आवडलेलं नाही. ईडीच्या आतल्या लोकांनी मला सांगितलं की, तुमच्या घरावर छापेमारीची तयारी केली जात आहे. मी आतुरतेनं ईडीची वाट पाहत आहे. मी स्वतःच्या हातानं त्यांना चहा आणि बिस्किटं खाऊ घालणार आहे.” राहुल गांधी यांनी हे ट्वीट करत ईडीच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग देखील केलं आहे. (Rahul Gandhi)
राहुल गांधींनी ‘चक्रव्यूह’ भाषणात नेमकं काय म्हटलं?
“जे ‘चक्रव्यूह’ तयार झालं आहे. यामुळे लोकांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. आम्ही हे चक्र खंडित करू. याला छेद देण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे जातिगणना. ज्याची तुम्हा सर्वांना भीती वाटते. I.N.D.I.A या सभागृहात गॅरंटीड कायदेशीर MSP पास करेल. आम्ही या सभागृहात जात जनगणना पास करून दाखवू. महाभारतातील चक्रव्यूहात भीती, हिंसाचार आहे आणि सहा जणांनी अभिमन्यूला अडकवून मारलं. चक्रव्यूहचे वर्णन पद्मव्यूह असं करताना ते म्हणाले की, ते उलट्या कमळासारखं आहे. नवं चक्रव्यूह तयार केलं आहे, तेही कमळाच्या आकारात, ज्याला आजकाल पंतप्रधान मोदी छातीवर घेऊन फिरतात. अभिमन्यूला द्रोण, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वस्थामा आणि शकुनी अशी 6 जणांनी मारलं. आजही चक्रव्यूहाच्या मधोमध 6 लोक आहेत. चक्रव्यूहच्या अगदी केंद्रस्थानी 6 लोक त्यावर नियंत्रण ठेवतात, ज्याप्रमाणे त्यावेळी 6 लोक नियंत्रित करत असत, त्याचप्रमाणे आजही 6 लोक नियंत्रित करत आहेत.” असं राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community