Rahul Gandhi यांनी अमेरिकेत जाऊन चीनचे कौतुक करताना दिली खोटी माहिती

चीनने आपल्या देशातील बेरोजगारी कशी कमी केली, हे भारत आणि अमेरिकेसारख्या देशांना चीनकडून शिकावे, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.

186
I.N.D.I. आघाडीची फोड करून सांगताना Rahul Gandhi यांनी स्वतःची लाज काढली!

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या तीन दिवसीय यूएस दौऱ्याची सांगता केली आणि कॅपिटल हिल येथे अमेरिकन खासदारांसोबत बैठकीची योजना आखली. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या मते प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने भारतीय समुदायासोबतच्या कार्यक्रमांमुळे हा दौरा यशस्वी झाला. राहुल गांधी हे त्यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे चर्चेत राहिले. आरएसएसवर टीका, शीखांचे धार्मिक स्वातंत्र्य, आरक्षण या विषयांवर त्यांनी वादग्रस्त विधाने केली. राहुल गांधी जगात कुठेही गेले तरी ते चीनची स्तुती नक्कीच करतात, चीनवर ते प्रभावित झाले आहेत.

चीनमध्ये बेरोजगारी कमी असल्याचा दावा  

सध्या राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेरिकेत आहेत आणि तिथे त्यांनी उघडपणे चीनचे कौतुक केले. चीनने आपल्या देशातील बेरोजगारी कशी कमी केली, हे भारत आणि अमेरिकेसारख्या देशांना चीनकडून शिकावे, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले. वास्तविक चीनमध्येच बेरोजगारी वाढली आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, 2023 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी चीनमध्ये बेरोजगारीचा दर भारतापेक्षा जास्त होता. चीनमध्ये बेरोजगारीचा दर ४.७ टक्के होता, तर भारतातील बेरोजगारीचा दर ४.२ टक्के होता. गेल्या वर्षी चीनमधील तरुणांमधील बेरोजगारीचा दर २१ टक्क्यांहून अधिक झाला होता. त्यानंतर चीन सरकारने ही वाढती बेरोजगारी लपवण्यासाठी बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करणे बंद केले होते.ही आकडेवारी अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्टने आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. द साउथ चायना मॉर्निंग पोस्ट नावाचे एक चिनी वृत्तपत्रानेही आपल्या अहवालात म्हटले की, चीनमध्ये बेरोजगारी इतक्या वेगाने वाढत आहे की, तेथील तरुण लग्न करत नाहीत, त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या पालकांकडून पगार घेत आहेत. कारण ते बेरोजगार आहेत आणि भारताप्रमाणेच चीनमध्येही सरकारी नोकऱ्यांसाठी बेरोजगरांची चेंगराचेंगरी झाली आहे.

(हेही वाचा Hindus In Bangladesh : ‘अजानच्या पाच मिनिटे आधी पूजा आणि स्पीकर बंद करा; बांगलादेशच्या गृहमंत्रालयाचा फतवा)

सरकारी नोकऱ्यांसाठी गर्दी 

चीनमध्ये, नोव्हेंबर 2023 मध्ये, राष्ट्रीय नागरी सेवकांच्या 39 हजार 600 नोकऱ्यांसाठी भरती झाली, ज्यासाठी 30 लाख तरुणांनी अर्ज केले. प्रत्येक कामासाठी ७७ तरुणांमध्ये स्पर्धा होणार होती. यावरून तुम्ही समजू शकता की चीनमधील बेरोजगारीची स्थिती आपल्यापेक्षा चांगली नाही, परंतु असे असतानाही राहुल गांधी चीनची भूमी समृद्ध असल्याचे सांगतात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.