- खास प्रतिनिधी
एकीकडे भारतात जातनिहाय जनगणना करण्याचा आग्रह धरत असताना अमेरिकेत जाऊन काँग्रेस आरक्षण रद्द करणार, अशी वल्गना करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आरक्षणाबद्दल संभ्रमावस्थेत आहेत का? असा सवाल देशातील जनतेकडून विचारला जात आहे.
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी गेले काही महिने लावून धरत आहेत. गेले दोन दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना भारतातील आरक्षण रद्द करू असे वक्तव्य केले. भारत हे समाजिकदृष्ट्या अनुकून बणल्यानंतर काँग्रेस आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल, असे त्यांनी म्हटले.
(हेही वाचा – Navi Mumbai Municipal Corporation पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी)
पटोले, वडेट्टीवार गप्प का?
गांधी (Rahul Gandhi) यांच्या विधानावर समाजमाध्यमांवरही प्रचंड टीका होत असून अगदी जवाहरलाल नेहरू यांच्यापासून काँग्रेसची आरक्षणविरोधी भूमिका असल्याचे काहींनी स्पष्ट केले. ‘काँग्रेस पक्ष दलित ओबीसी आणि मराठ्यांचे आरक्षण संपवणार, राज्यातील काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार आता तोंडाला लॉलिपॉप घेऊन का बसलेत?’ असा सवाल एका नेटकाऱ्याने केला.
‘नेहरूंपासून पप्पूपर्यंत समर्थानात नव्हती’
‘नेहरूंपासून पप्पू पर्यंत खानग्रेस कधीच आरक्षणाच्या समर्थानात नव्हती…. संसाधनावर प्रथम हक्क त्यांना ज्यांना द्यायचा होता त्यांना तो हक्क देण्यात आरक्षण ही महत्त्वाची अडचण होती लोकांना निरक्षर, कर्महीन ठेवून फुकट खायची सवय लावून गरीब ठेवणे आणि आपली सत्ता टिकवणे हा एकच कार्यक्रम,’ अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
(हेही वाचा – Hindus In Bangladesh : ‘अजानच्या पाच मिनिटे आधी पूजा आणि स्पीकर बंद करा; बांगलादेशच्या गृहमंत्रालयाचा फतवा)
जाती-जाती मध्ये भांडण
‘भारत हे सामाजिकदृष्ट्या अनुकूल झाल्यावर आरक्षण संपविण्याचा विचार करेल, असे म्हणाले आहे राहुल गांधी (Rahul Gandhi). पण तुमचा पक्ष सामाजिक दृष्टी अनुकूल होऊ देईल का? जितेतिथे जातीवाद निर्माण करून ठेवला आहे. जाती-जाती मध्ये भांडण लावाचे काम करत आहे तुमचा पक्ष,’ असे एकाने सुनावले.
७० वर्ष कोणी अडवलं?
‘७० वर्ष कोणी अडवलं होत भारताला सामाजिक दृष्ट्या अनुकूल बनवायला?’ असा प्रश्न एकाने उपस्थित करत, ‘शरद पवारासारखा भामटा जातीयवादी राजकारणासाठी B ग्रेड सारखी C ग्रेड टोळीची स्थापना करत होता तेव्हा नाही आठवलं का ‘सामाजिक दृष्ट्या अनुकूल?’ असेही पुढे म्हटले.
(हेही वाचा – Maharashtra TET 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024′ अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर)
जरांगेना प्रश्न
‘लॉलीपॉप राहुल गांधींचा (Rahul Gandhi) आहे पटोलेच्या तोंडात. तो जरा जास्त गोड लागतो पटोलेला. इतके चाटू आणि स्वाभिमान गहाण ठेवलेले लोकच काँग्रेस मध्ये राहू शकतात,’ अशा टिकत शब्दांत काहीनी राग व्यक्त केला. तर काहींनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना सोडले नाही, ‘ए जरांग्या राहुळ्याला दे की रे शिव्या, आता का तोंडात घेऊन बसला? का वाचायला येत नाही आता?’ अशी प्रतिक्रिया दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community