शनिवार, ८ जून रोजी काँग्रेस कार्यकारिणी आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठक पार पडल्या. या बैठकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना विरोधी पक्षनेते करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (Congress Working Committee) सदस्यांनी राहुल गांधी यांना लोकसभेत पक्षाचे नेते म्हणून नियुक्त करण्याचा ठराव मंजूर केला आहे. या कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आहेत.
वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर (Loksabha Election 2024) स्थापन झालेल्या लोकसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते. याच मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसच्या पडत्या काळात नेतृत्व घेऊन काम केले. आता काही राज्यांत काँग्रेसचे वजन वाढताच पुन्हा गांधी घराण्यातील नेत्याचीच विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आता काँग्रेसचे सर्वच नेते राहुल गांधीच या पदासाठी कसे योग्य आहेत, हे सांगत आहेत.
(हेही वाचा – Shivsena : शिवसेनेची संघटनात्मक ताकद पडली कमी)
काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधींचे समर्थन
सीडब्लूसी बैठकीनंतर काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी म्हणाले की, राहुल गांधींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते नक्कीच व्हायला हवे. आमच्या कार्यकारिणीची ही विनंती आहे. राहुल गांधी निर्भय आणि धैर्यवान आहेत.
काँग्रेस पक्षाचे नेते के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, आता काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन सुरु झाले आहे. नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आणि देशातील जनतेचा आवाज व्हावे, ही आमच्या कार्यकारिणीची इच्छा आहे. त्यांच्या जोरावर त्यांना सत्य जनतेसमोर आणण्याचे बळ मिळेल.
के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने राहुल गांधींना (Rahul Gandhi) लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली आहे. संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी हे सर्वांत योग्य व्यक्ती आहेत.
नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ
लोकसभा निवडणूक २०२४ च्या विजयानंतर, NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 293 जागा जिंकल्या आहेत. यात एकट्या भाजपच्या 240 जागा आहेत. या शपथविधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान,नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित रहाण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community