भाजपला पराभव करण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाची बदनामी करण्यासाठी खोटे नेरेटिव्ह सेट केले. त्याहून मोठा कहर म्हणजे लोकसभा विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती झाल्यावर पहिल्याच भाषणात राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटले. ज्यामुळे देशभरात असंतोष पसरला. आता राहुल गांधींना पंढरपुरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे, त्यासाठी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी ते १३ किंवा १४ जुलै या दिवशी पंढरपूर येथे येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. याविषयी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दुजोरा दिला आहे. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राहुल गांधी यांना वारीमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. यावरून त्यांच्यावर भाजपकडून टीका केली जात आहे.
मौलाना शरद पवारांना अधिकार दिला कुणी?
हिंदूंना हिंसक म्हणणार्या आणि हिंदूंचा कायम तिरस्कार करणार्या राहुल गांधीना (Rahul Gandhi) आषाढी वारीत येण्याचे निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवारांना कुणी अधिकार दिला? अशी टीका करत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी महाविकास आघाडीसह राहुल गांधी आणि शरद पवारांवर टीका केली आहे. ‘शरद पवार यांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते, पण शरद पवार यांचे त्यांच्या ८४ वर्षांच्या आयुष्यात कधी वारीकडे पाय वळले नाहीत आणि ते कोणत्या तोंडाने राहुल गांधी यांना निमंत्रण देत आहेत?’ असा प्रश्नही तुषार भोसले यांनी केला आहे.
(हेही वाचा Rahul Gandhi यांचे वक्तव्य एक पूर्वनियोजित षडयंत्र; बजरंग दलाकडून ठिकठिकाणी निदर्शने)
जनता दूधखुळी नाही
शरद पवार ७ जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकर्यांसह चालणार, अशा चर्चा मधल्या काळात होत होती, मात्र याविषयी स्वत: शरद पवार यांनी स्पष्टीकरण देत ‘मी वारीत चालणार नसून वारी माझ्या गावावरून जाते, त्यामुळे केवळ पंढरपूरला जाणार्या पालखीच्या स्वागतासाठी मी थांबणार’, असे सांगितले. याच मुद्यावर बोलताना तुषार भोसले यांनी ‘कायम इप्तार पार्ट्या झोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आजपर्यंत कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत; मात्र आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन तुम्ही वारीत यायला बघत आहात, हे न कळायला महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही, हे लक्षात ठेवा’, अशा शब्दांत पवारांवर टीका केली आहे.
Join Our WhatsApp Community