‘संविधान बचाव’ म्हणून कांगावा करणारे Rahul Gandhi स्वतःच करतात कायद्याची पायमल्ली; ‘इतके’ खटले दाखल; पण…

एका बाजूला संविधान बचाव म्हणून आरडाओरडा करणारे राहुल गांधी त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या या खटल्यांना हजर राहण्याचे टाळतात, त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा ते अवमान करतात, ही राहुल गांधी यांची दुटप्पी भूमिका यानिमित्ताने समोर येत आहे.

37

नरेश वत्स 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरुद्ध देशाच्या विविध न्यायालयांमध्ये अनेक खटले दाखल आहेत. ‘मोदी’ आडनावावरून त्यांनी उडवलेल्या खिल्लीप्रकरणी सुरतमधील स्थानिक न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले होते. त्यामुळे २०२३ मध्ये राहुल गांधींनी त्यांचे लोकसभा सदस्यत्व गमावले होते. राहुल गांधींविरुद्ध देशातील विविध न्यायालयांमध्ये विविध विषयांवर अनेक खटले सुरू आहेत. हे सर्व खटले न्यायप्रविष्ट आहेत.

२०१४ पासून राहुल गांधींविरुद्ध (Rahul Gandhi) न्यायालयात २० हून अधिक खटले सुरू आहेत. २०१९ मध्ये राहुल गांधींवर ५ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चेचा खटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाशी संबंधी आहे. राहुल गांधी यांनी एका निवडणूक सभेत म्हटले होते की, ‘या सर्व चोरांना ‘मोदी’ का म्हणतात?’ राहुल गांधींच्या या वादग्रस्त टिप्पणीवरून पाटणा, रांची, अहमदाबाद, सुरत आणि नवी दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल गांधींना (Rahul Gandhi) सुरत प्रकरणात शिक्षा झाली आहे. परंतु इतर ठिकाणी अजूनही खटले सुरू आहेत. मात्र एका बाजूला संविधान बचाव म्हणून आरडाओरडा करणारे राहुल गांधी त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या या खटल्यांना हजर राहण्याचे टाळतात, त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा ते अवमान करतात, ही राहुल गांधी यांची दुटप्पी भूमिका यानिमित्ताने समोर येत आहे.

राहुल गांधींविरुद्ध न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांची जंत्री  

  • २०१९ मध्ये ‘मोदी’ या आडनावाबाबत केलेल्या चुकीच्या टिप्पणीबद्दल राहुल गांधी यांना एका फौजदारी खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे.
  • राहुल गांधींविरुद्ध (Rahul Gandhi) पहिला खटला २०१४ मध्ये महाराष्ट्रातील भिवंडी येथील संयुक्त दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला होता. महात्मा गांधींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्या विधानाबद्दल हा खटला दाखल करण्यात आला होता. या टिप्पणीसाठी राहुल गांधींविरुद्ध फौजदारी आणि दिवाणी न्यायालयात मानहानीचा खटला सुरू आहे.
  • भाजपा खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
  • संसदेच्या आवारात भाजपा खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांना धक्काबुक्की केल्याबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर काँग्रेस खासदारांनी संसदेच्या आवारात गोंधळ घातला होता. राहुल गांधींवर भाजप खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप होता.

(हेही वाचा Veer Savarkar यांच्या बदनामीचा खटला रेंगाळत ठेवण्याचा Rahul Gandhi यांचा प्रयत्न ठरला फोल)

देशाच्या वेगवेगळ्या भागात गुन्हे दाखल 

  • २०१६मध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका खून प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते. यानंतर, आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. हा खटला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला.
  • २०१८ मध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप कार्यकर्त्यांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यासाठी राहुल गांधींविरुद्ध तीन मानहानीचे खटले दाखल करण्यात आले. हा गुन्हा लखनऊ, उत्तर प्रदेशची राजधानी सुलतानपूर आणि झारखंडची राजधानी रांची येथे दाखल करण्यात आला.
  • २०१९ मध्ये राहुल गांधींविरुद्ध (Rahul Gandhi) देशाच्या वेगवेगळ्या भागात पाच गुन्हे दाखल झाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या आडनावाबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. हे गुन्हे पटना, रांची, अहमदाबाद, नवी दिल्ली आणि सुरत येथे नोंदवण्यात आले.
  • २०२१ मध्ये राहुल गांधींविरुद्ध झारखंडच्या चाईबासा, दिल्ली आणि मुंबई येथे तीन गुन्हे दाखल झाले. ‌दिल्लीतील बलात्कार पीडितेबाबत केलेल्या दाव्यांमुळे राहुल गांधींवर हे करण्यात आले. या प्रकरणात राहुल गांधींवर POCSO चा कलमही लावण्यात आला आहे. सध्या हा खटला दिल्ली उच्च न्यायालयात सुरू आहे. जर राहुल गांधी यात दोषी आढळले तर त्यांना २ वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा होऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  • २०२२ मध्ये कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये राहुल गांधींविरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल गांधींवर परवानगीशिवाय थीम सॉन्ग तयार केल्याचा आरोप होता.
  • अमेरिकेतील शीख समुदाय आणि आरक्षणाबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल राहुल गांधींविरुद्ध (Rahul Gandhi) दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीर सावरकर यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अनेक गुन्हे दाखल

  • २०२२ मध्ये वीर सावरकरांवर वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल राहुल गांधींविरुद्ध (Rahul Gandhi) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण लखनऊमध्ये सुरू आहे. स्थानिक वकील नृपेंद्र पांडे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, १७ डिसेंबर २०२२ रोजी, त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेतली, त्या दरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा बिनबुडाचे आरोप करत त्यांचा अवमान केला.
  • लंडनमध्ये वीर सावरकरांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल महाराष्ट्रातील पुणे न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध खटलाही प्रलंबित आहे. पुण्याचे विशेष न्यायालय ७ एप्रिल रोजी या प्रकरणात निर्णय देऊ शकते.
  • नाशिक जिल्ह्यातील न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.
  • २०२३ मध्येही राहुल गांधींविरुद्ध सुरतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोदी समुदायाचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला आहे.
  • २०२४ मध्येही आसाममध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान हिंसाचार भडकवल्याबद्दल राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाला आहे. यावर्षी कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.