राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपासाठी इंडी आघाडीचे (india aghadi) बाकीचे सगळे नेते आले, पण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) मात्र पोहोचले नाहीत. (Rahul Gandhi)
ते नेमके का आले नाहीत ?, असा सवाल अनेक ठिकाणी विचारला गेल्यानंतर काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennith) यांनी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आजारी असल्याचे सांगून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला, पण खुद्द अखिलेश यादव यांनी त्यानंतर लखनऊतून एक पत्रक काढून आपण निवडणूकीच्या तयारीत मग्न असल्यामुळे मुंबईत आलो नसल्याचा खुलासा केला. त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात “कन्फ्युजन” असल्याचे जनतेसमोर आले. (Rahul Gandhi)
निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने येऊ शकणार नाही- अखिलेश यादव
मुंबईतल्या महारॅलीमध्ये इंडी आघाडीतले बाकीचे सगळे नेते आले, पण अखिलेश यादव का आले नाहीत ?, असा सवाल पत्रकारांनी रमेश चेन्निथला (Ramesh Chennith) यांना केला. त्यावर अखिलेश यादव व्हायरल फिवरने आजारी आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असे उत्तर त्यांनी त्याला यांनी दिले. हे उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली, पण चेन्निथला यांचे उत्तर माध्यमांनी टीव्ही चॅनेलवर चालवून काही वेळच झाला असेल तोच अखिलेश यादव यांचा वेगळाच खुलासा समोर आला.अखिलेश यादव यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पत्र लिहून ते आपल्या सोशल मीडिया हँडल वरून व्हायरल केले. उत्तर प्रदेश मध्ये २० मार्चपासून निवडणूक अर्ज भरायचा दिवस असल्याने निवडणुकीच्या कामाची घाई गर्दी उडाली आहे. आपण मुंबईत येऊ शकलो नाही, पण भाजपचा पराभव करायला आपण एकत्र आहोत, अशी ग्वाही अखिलेश यादव यांनी या पत्रातून दिली. (Rahul Gandhi)
(हेही वाचा- Madha Lok Sabha : माढा लोकसभा मतदारसंघात भाजप कात्रीत; मोहिते पाटलांविरोधात रणजित निंबाळकरांचे शक्तीप्रदर्शन)
चेन्निथला आणि अखिलेश यादव यांच्या उत्तरात विसंगती…
पण रमेश चेन्निथला (Ramesh Chennith) यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याचा खुलासा आणि अखिलेश यादव यांनी लिहिलेले पत्र याच्यातली विसंगती मात्र लपून राहिली नाही. त्यामुळे इंडी आघाडीत एकत्र असले तरी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीतल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये किती विसंवाद आहे हेच समोर आले. (Rahul Gandhi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community