राहुल गांधी यांना होणार अटक?

95
सध्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडिया प्रकरणी ईडीकडून जोरदार चौकशी सुरु झाली आहे. यावर देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत, मात्र तरीही ईडीकडून सुरू असलेली कारवाई गंभीर स्वरूप धारण करणार आहे. यात राहुल गांधी यांना अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तशी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते दबक्याआवाजात चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधींना तुरुंगात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम यांनी आधीच सांगितले आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंब भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकत चालले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. देशाच्या विविध भागात काँग्रेस जनांनी निदर्शने सुरू केली आहेत. तरीही ईडीची कारवाई जोरदार सुरु आहे. नेहरू-गांधी घराणे कायद्याच्या वर आहे का, असा प्रश्न काँग्रेस नेतृत्वावर उपस्थित केला जात आहे.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

1938 मध्ये सुरू झालेली नॅशनल हेराल्डचे वृत्तपत्र मार्च 2008 पर्यंत चालू होते. 1995 मध्ये कर्मचार्‍यांच्या पगाराचे कारण देत लखनऊ येथील आवृत्ती अँड केली. 2008 मध्ये तांत्रिक कारण देत दिल्ली आवृत्तीही बंद करण्यात आली, पण नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएट जरनल लिमिटेडला काँग्रेसने 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले.

काय आहे घटनाक्रम?

  • नोव्हेंबर २०१२ मध्ये सुब्रह्मण्यम स्वामी यांनी जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी गांधीविरोधात गुन्हेगारी स्वरुपाची तक्रार दाखल.
  • जून २०१४ मध्ये महानगर दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये प्राथमिक पुरव्यांच्या आधारे सर्व आरोपींना सन्मस.
  • ऑगस्ट २०१४ मध्ये ईडीने या प्रकरणामध्ये मनी लाँडरिंग जाळे आहे की नाही यासंदर्भात तपास सुरु.
  • सप्टेंबर २०१५ मध्ये ईडीने या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरु.
  • डिसेंबर २०१५ मध्ये पतियाला कोर्टाने सोनिया आणि राहुल गांधींना जामीन मंजूर.
  • फेब्रुवारी २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये आरोपींविरोधतील कारवाई रद्द करण्याची याचिका फेटाळली.
  • मे २०१९ मध्ये ईडीने या प्रकरणामध्ये १६ कोटी ३८ लाखांची संपत्ती प्रकरणामध्ये ताब्यात घेतली.
  • जून २०२२ मध्ये ईडीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सोनिया गांधींना सन्मन बजावले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.