सावरकर अवमानप्रकरणी माफी मागत नाही, तोपर्यंत राहुल गांधींना मुंबईत पाय ठेवू देणार नाही!

154

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक विधानाबाबत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी जाहीरपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी दिला.

( हेही वाचा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर राहुल गांधींना ‘जोडे मारो’ आंदोलन  )

वीर सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ राहुल गांधी यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलनात करण्यात आले. त्यावेळी शेवाळे बोलत होते. सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्यासह शालेय मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, विभागप्रमुख गिरीश धानुरकर, महिला विभाग संघटिका प्रिया गुरव यांसह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

खासदार राहुल शेवाळे आणि रणजित सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दुपारी १२ वाजता, शिवाजी पार्क येथे काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. यावेळी ‘सावरकरजी के सन्मान में, शिवसेना मैदान में’ अशा घोषणाही पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी दिल्या., congr

…तर त्वरित महाविकास आघाडीतून बाहेर पडावे

काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनीही काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला होता, तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात जोडे मारा आंदोलन केले होते. त्यांच पद्धतीने आज आम्ही देखील हे जोडे मारो आंदोलन करून राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करत आहोत. या विधानाबाबत माफी मागितल्या शिवाय त्यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही. अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने कॅबिनेट मध्ये, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी का केली नाही? खासदार संजय राऊत यांनी संसदेत ही मागणी का लावून धरली नाही? त्यांना खरेच सावरकरांविषयी आदर असेल, तर त्यांनी त्वरित महविकास आघाडीतून बाहेर पडायला हवे, असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.