देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वातावरण आहे. निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राहुल गांधी पुण्यातील सभेसाठी आले होते. यावेळी कॉंग्रेसचे पुण्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. अशा वेळी राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात येते. राहुल गांधी यांनी या मूर्तीचा यथोचित सन्मान केला नाही. ती मूर्ती हातातही घेतली नाही. त्यामुळे ट्रेंड होत असलेल्या या व्हिडियोमध्ये राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, असा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे. सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा व्हायरल झालेला व्हिडियो मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. ‘आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको’, अशा प्रतिक्रियाही काही नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
(हेही वाचा – Force Gurkha 5 Door : फोर्सची फाईव्ह डोअर गुरखा एसयुव्ही गाडी भारतात लाँच, किती आहे किंमत?)
Join Our WhatsApp CommunityThe sheer disrespect shown towards Hindu Hriday Samrat Chhatrapati Shivaji Maharaj is unacceptable.
While #Congress celebrates Tipu Sultan Jayanti in Karnataka, they disrespect the Hindutva icon Chhatrapati Shivaji Maharaj. #Congress‘s roots must have been derived from the… pic.twitter.com/NjEbneV133
— Satya Kumar Yadav (Modi Ka Parivar) (@satyakumar_y) May 4, 2024