काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या ‘भारत जोडो यात्रा’ सुरु आहे. सध्या ही यात्रा हरियाणामध्ये आली आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसवर टीका केली. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा वादात सापडले आहेत. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
तपस्वी बाबा का प्रातः कालीन नाश्ता करते दर्शन लाभ लीजिए… pic.twitter.com/Gkla0gkhly
— Arun Yadav 🇮🇳 (@beingarun28) January 8, 2023
पुरोहित समाजाच्या भावना दुखावल्या
राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे पुरोहित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. प्रयागवाल सभा प्रयागचे अध्यक्ष राजेंद्र पालीवाल यांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य बालिश स्वरूपाचे असून राहुल गांधी यांना वेद आणि पुराण वाचून ज्ञान मिळवण्याचा सल्ला दिला. तसेच राहुल गांधी यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे जाऊन ब्रह्म सरोवरात पूजा-आरती केली. तेथील त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यावेळी त्यांनी कपाळावर चंदनाचा टिळा लावला होता. यावेळी काँग्रेस नेतेही उपस्थित होते. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा तपस्या करणाऱ्यांचा पक्ष आहे, तर भाजप हा व्यक्तीपूजा करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांना जबरदस्तीने त्यांची पूजा करण्यास सांगतात, असेही राहुल गांधी म्हणाले.
Join Our WhatsApp Community