काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण दोन वेळा समन्स बजावल्यानंतरही पुणे न्यायालयात राहुल गांधी (Rahul Gandhi) हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी वकील संग्राम कोल्हटकर (Sangram Kolhatkar) यांनी पुणे कोर्टात केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत पुणे कोर्टात गांधी यांच्यावर बदनामी खटला दाखल झाला आहे. त्यावर २ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते हजर राहिले नाहीत. आता पुढील सुनावणी १० जानेवारी रोजी होणार आहे.
अॅड संग्राम कोल्हटकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला प्रतिक्रिया देताना सांगितले की, दोन वेळा समन्स देऊनही राहुल गांधी हजर न राहिल्याने आम्ही आक्षेप घेत, न्यायालयाने कठोर कारवाई करावी, यासाठी मागणी केली आहे. मात्र पुढच्या सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघू शकतो, असे कोल्हटकर (Sangram Kolhatkar) म्हणाले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
लंडनमधील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेता असल्याने संसदेच्या सत्रात असल्याने या ठिकाणी हजर राहता आले नाही, असा युक्तीवाद राहुल गांधींच्या वकीलांनी कोर्टात केला आहे. या प्रकरणी सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) म्हणाले की, न्यायालयाने त्यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. ते सगळीकडे फिरत आहेत. सभा घेत आहेत. परंतु न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाहीत. (Rahul Gandhi)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community