राहुल गांधींच्या काळात कॉंग्रेसचं जितकं हसं झालं, तितकं कधीच झालं नसावं. एकतर राहुल गांधी काय बोलतात त्यांचं त्यांना कळत नाही. पाठ्यपुस्तकात भूगोल बदलला नाही म्हणून त्यांना काळजी वाटते, तर कधी ते पीठ लिटरमध्ये विकू पाहतात. इतकी अद्भूत बुद्धिमत्ता या माणसाला कुणी प्रदान केली असावी, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. आता अनेकदा नापास झाल्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा परीक्षेला बसले आहेत.
काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे भारताचे तुकडे
काँग्रेसचे युवराज आता भारत जोडायला निघाले आहेत. एकतर ते स्वतःला गांधीजींचे आणि क्रांतिकारकांचे वारस समजतात. म्हणून ते म्हणत असतात की आम्ही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्यामुळे त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्या पक्षाच्या नाकर्तेपणामुळे भारताचे तुकडे पडलेले आहेत. फाळणी होऊ द्यायची नसेल तर क्रांती करावी लागणार होती आणि तत्कालीन कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये क्रांती घडवून आणण्याची धमक नव्हती म्हणून फाळणी झालेली आहे.
(हेही वाचाः दर्शन घेणारे मुख्यमंत्री आणि दर्शन न देणारे मुख्यमंत्री)
काँग्रेसला गांभीर्य नाही
तसेच स्वातंत्र्यानंतर देखील कॉंग्रेसला काश्मीर प्रश्न हाताळता आला नाही, तो प्रश्न आता मोदींनी सोडवला आहे. काश्मीरमधील फुटीरतावादी वातावरण राहील याची काँग्रेसने पुरेपूर काळजी घेतली होती. त्रिपुरात सुद्धा कम्युनिस्टांनी घातलेला हैदोस कॉंग्रेसला दिसला नाही. त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील नेत्यांकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि कोणत्याच समस्येवर समाधान नव्हतं, त्याचप्रमाणे आताच्या कॉंग्रेसलाही कोणत्याच प्रश्नाचं गांर्भीय नाही, या एका अर्थाने राहुल गांधी त्यांचे वारस असावेत.
राहुल गांधींचा डाव
युवराज मोठ्या थाटात फिरत आहेत. भारत जोडो म्हणे. पण राहुल गांधी हे विसरले की त्यांच्या कॉंग्रेसनेच भारत तोडलेला आहे. मग आता गांधींना भारत खरोखर जोडायचा आहे का? नाही, तर त्यांना नरेंद्र मोदींचे मतदार तोडायचे आहेत. त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की भारतातील ग्रामीण भागातून मोदींना उत्तम प्रतिसाद मिळतोय. ही मते आपल्याला नाही मिळाली तरी मोदींना मिळता कामा नये, हा डाव राहुल यांना साधायचा आहे. आजकाल कॉंग्रेस स्वतःच्या विजयावर नव्हे तर मोदींच्या पराभवावर खूश होते.
राहुल गांधी यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, भारताची जनता सुजाण आहे. भारत तोडणार्यांच्या हाती पुन्हा देश कधीच सोपवणार नाही.
Join Our WhatsApp Community