राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला आहे. त्यात भाजपाप्रणित महायुतीचा मोठा विजय झाला आहे. अशा वेळी नेहमीप्रमाणे राहुल गांधी हे पुन्हा ईव्हीएमच्या (EVM) विरोधात बोटे मोडत आहेत. तसेच निवडणुका बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी करत आहेत. जिथे काँग्रेसला यश मिळते तिथे हेच काँग्रेसवाले आणि राहुल गांधी निवडणूक आयोगाचे कौतुक करतात आणि जिथे भाजपाचा विजय होतो तेव्हा हेच काँग्रेसवाले निवडणूक आयोगावर टीका करताना ईव्हीएमवर (EVM) खापर फोडतात.
ज्या ईव्हीएमवर (EVM) अविश्वास दाखवत राहुल गांधी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी करतात, एकेकाळी त्याच राहुल गांधी यांचे वडील तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीवर अविश्वास दाखवत होते. त्यामुळे एकीकडे मुलगा ईव्हीएमच्या विरोधात गळा काढत आहे आणि वडील बॅलेट पेपरच्या विरोधात ओरडत आहेत. अरेरे! हा तर यांचा पिढीजात उद्योगच दिसतोय. बॅलट पेपरवरून बाप रडत होता, EVM वरून लेक रडतोय! नुसती रडारड, अशा आशयाने सोशल मीडियात राजीव गांधी यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
(हेही वाचा BMC : मुंबईत ३६०५ मालमत्तांकडे सुमारे १७०० कोटींची थकबाकी; महानगरपालिकेकडून जप्ती आणि अटकावणीची कारवाई)
भाजपाच्या यशावर राजीव गांधी होते नाराज
या व्हिडिओमध्ये राजीव गांधी म्हणत आहेत, मागील संसदेच्या निवडणुकीत भाजपाला ८२ जागा निवडून आल्या. त्यांची ताकद अजून वाढलेली नाही. त्यांचा मतांचा टक्का मुश्किलीने ८ वरून १२ टक्का झाला आहे. ८ टक्के मते मिळाली तर २ जागा मिळाल्या आणि १२ टक्क्यामध्ये ८२ जागा मिळाल्या, हा हिशेब जुळत नाही. हा हिशेब लावला तर काँग्रेसच्या ५०० जागा झाल्या पाहिजे होत्या, असे राजीव गांधी म्हणत आहेत. यावरून राजीव गांधी हे बॅलेट पेपरवरून करण्यात येत असलेल्या निवडणुकीवर अविश्वास दाखवत होते. आता त्याच राजीव गांधी यांचा मुलगा राहुल गांधी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असे सागंत आहे, हा विरोधाभास काँग्रेसचेच हसे करत आहे. (EVM)
Join Our WhatsApp Community