Rahul Gandhi यांचा देशात पुन्हा वादंग माजवण्याचा कट; अमेरिकेत इल्हान उमरची घेतली भेट

इल्हान उमर या सोमालियन-अमेरिकन राजकारणी आहे. तिने यापूर्वी अनेकदा भारतविरोधी भूमिका घेतली आहे. तिने पीओकेला पाकिस्तानचा भाग म्हणून घोषित केले आहे.

234

विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या देशात अशांतता, वादंग माजवणाऱ्या घटकांची भेट घेऊन कटकारस्थाने करत असतात. ज्यामुळे देशात उद्रेक होत आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी भारतविरोधी भूमिका मांडणाऱ्या इल्हान उमरची भेट घेतली. त्यानंतर लागलीच भारतात निदर्शने सुरु झाली आहेत.

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी, रेबर्न हाऊस येथे अमेरिकन काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यात इल्हान उमरही उपस्थित होत्या. या भेटीनंतर भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका सुरु केली आहे. राहुल सत्तेवर येण्यासाठी आतुर आहेत, त्यामुळेच ते कट्टरपंथी नेत्याला भेटत आहेत. गृहमंत्री अमित शहा म्हणाले, देशविरोधी बोलणे आणि देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील देशविरोधी आणि आरक्षणविरोधी अजेंड्याला पाठिंबा देणं असो, किंवा परदेशी मंचांवर भारतविरोधी बोलणं असो, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावल्या आहेत.

(हेही वाचा हिंदु राष्ट्र कायम ठेवायचे असेल, तर मोदींनी योगींकडे सत्ता सोपवावी; Sharad Ponkshe यांचे परखड प्रतिपादन)

पीओकेला समर्थन 

इल्हान उमर या सोमालियन-अमेरिकन राजकारणी आहे. तिने यापूर्वी अनेकदा भारतविरोधी भूमिका घेतली आहे. तिने पीओकेला पाकिस्तानचा भाग म्हणून घोषित केले आहे. वास्तविक, इल्हान उमरने २०२२ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. या काळात ती पाकव्याप्त काश्मीरमध्येही गेली. तिला पाकिस्तान सरकारने आर्थिक मदत केली होती. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि इम्रान खान यांचीही भेट घेतली. त्यावर भारताने तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. सरकारने ओमरच्या पाकिस्तान आणि पीओके दौऱ्याला क्षुद्र राजकारण म्हटले होते. 40 वर्षीय इल्हान उमर ही एक सोमालियन-अमेरिकन राजकारणी आहे, ज्यांनी 2019 मध्ये मिनेसोटामधून निवडणूक जिंकून यूएस लोअर हाऊसमध्ये प्रवेश केला. 1991 मध्ये सोमालियन गृहयुद्धामुळे त्यांचे कुटुंब देश सोडून अमेरिकेत आले. एकदा भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, लडाखमध्ये चीनने दिल्लीइतकीच जमीन ताब्यात घेतली आहे. पंतप्रधान मोदी चीनला सांभाळू शकत नाहीत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.