Chinchwad by-Election: चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी; राहुल कलाटे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

255

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी रात्री चिंचवड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी लढणार असून मंगळवारी सकाळी अर्ज सादर करण्यात येईल, ऐनवेळी उमेदवार जाहिर करू असे सांगितले होते. यामुळे चिंचवडमध्ये मविआचा उमेदवार कोण? राहुल कलाटे की नाना काटे? असे प्रश्न उपस्थित होत होते. अखेर मंगळवारी सकाळी चिंचवडसाठी मविआचा उमेदवार ठरला. नाना काटे राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करून दिली. पण आता या निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे राहुल कलाटे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

शिवसेनेचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे अपक्ष म्हणून चिंचवडची निवडणूक लढणार आहेत. राहुल कलाटे उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही निवडणुकही रंगतदार होणार असल्याचे म्हटले जात आहे. एका वृत्त संकेतस्थळाशी बोलताना राहुल कलाटे म्हणाले की, ‘चिंचवड विधानसभा निवडणुक लढण्यासाठी मविआतील तिन्ही पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण मला उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे मी आता ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहे.’

तसेच राहुल कलाटे यांनी मतदार सहानुभूती दाखवण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. २०१४ची विधानसभा कलाटे यांनी शिवसेनेकडून लढली होती. तर २०१९ची विधानसभा निवडणूक ते अपक्ष म्हणून लढले होते.

(हेही वाचा – Chinchwad by-Election: चिंचवडची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला: नाना काटे भरणार उमेदवारी अर्ज)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.