Rahul Kalate : पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का; राहुल कलाटे करणार शिवसेनेत प्रवेश

राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली

161
Rahul Kalate : पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का; राहुल कलाटे करणार शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद हा काही नवीन विषय नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटाला अनेक झटके बसत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

चिंचवडचे राहुल कलाटे (Rahul Kalate) शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या आमदारांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत. राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पिंपरी चिंचवडच्या चार माजी नगरसेवकांसह राहुल कलाटे आज (सोमवार १७ जुलै) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

(हेही वाचा – AI : आता आपल्या भाषेतून शिका AI तेही मोफत; केंद्र सरकारची नवी मोहीम)

बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत (Rahul Kalate) येणाऱ्यांचा ओघ काही कमी झालेला नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदे, निलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीषी कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारीही सोपवली. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. तसेच माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरली होती

कोण आहेत राहुल कलाटे?

कलाटे कुटुंबीय २००१ पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर २००२ साली राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत पराभूत झाले. नंतर त्यांनी २०१४ च्या विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढली, तेव्हा दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. ते २०१७ मध्ये पहिल्यांदा शिवसेनकडून नगरसेवक झाले. पालिकेत शिवसेनेचे गटनेते, तसेच शहराध्यक्ष होते. २०१९ रोजी विधानसभेवेळी युती असतांना बंडखोरी केली. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.