राज्यात शिवसेनेतून ३९ आमदार फोडून शिंदे गटाने भाजपासोबत सरकार स्थापन केले, नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर रविवारी, ३ जुलै रोजी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन भरवण्यात आले. त्यामध्ये एकूण २८७ विधानसभा सदस्यांपैकी १२ सदस्य गैरहजर होते, त्यातील २ भाजप, २ काँग्रेस, ७ राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या एका आमदाराचा समावेश होता.
अजित पवार यांचे समर्थक गैरहजर
- निवडणुकीमध्ये समाजवादी पक्ष आणि एआयएमचे तीन आमदार मतदानात तटस्थ राहिले.
- शिरणगतीमध्ये राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली, तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली.
- बहुजन विकास आघाडी, मनसे आणि अपक्ष आमदारांनी भाजपाच्या बाजूने उभे राहिले.
- राष्ट्रवादीकडून सात आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय भुवया उंचावल्या.
- माजी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असल्याने ते मतदानाला उपस्थित राहिले नाहीत.
- माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आईचे निधन झाल्याने ते सभागृहात येऊ शकले नाहीत.
- पारनेरचे आमदार निलेश लंके आजारी असल्याचे बोलले जात आहे.
- अजित पवार यांचे समर्थक मानले जाणारे बबनदादा शिंदे, खेडचे दिलीप मोहिते, पिंपरीचे अण्णा बनसोडेही मतदानासाठी अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
- तर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मतदानात भाग घेतला नाही.
(हेही वाचा जयंत पाटलांनी विधानपरिषद सभापती पदावर दिले वेगळेच संकेत!)
कोणते सदस्य होते गैरहजर?
भाजपा
- मुक्ता टिळक
- लक्ष्मण जगताप
काँग्रेस
- प्रणिती शिंदे
- जितेश अंतापुरकर
(हेही वाचा सुधीर मुनगंटीवारांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी! विधानसभेत तुफान फटकेबाजी)
राष्ट्रवादी
- नवाब मलिक
- अनिल देशमुख
- निलेश लंके
- दिलीप मोहिते
- दत्तात्रेय भरणे
- अण्णा बनसोडे
- बबनदादा शिंदे
एमआयएम
मुफ्ती इस्माईल
Join Our WhatsApp Community