दीपक केसरकरांनी दिला इशारा, आम्हीही ‘त्या’ १६ आमदारांना अपात्र ठरवू शकतो

91

विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट व्हिपचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेच्या विधानसभेतील उर्वरित १६ सदस्यांना इशारा दिला.

व्हीपवर काय म्हणाले केसरकर?

दीपक केसरकर म्हणाले, अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर राजकीय भाषणे होत नसतात, या ठिकाणी भाषणे झाली त्याच्यामध्ये व्हीपचा उल्लेख झाला, तसा आम्हीही काढलेला आहे आणि त्यांच्या ऑफिसवर दिला आहे. त्यामुळे आजचा दिवस चर्चा करायची नाही, अन्यथा आम्ही सुद्धा म्हणू शकलो असतो की आम्ही सुद्धा तुम्हाला व्हीप दिला आहे. आम्ही सुद्धा त्यांना अपात्रतेसाठी बोलू शकतो, पण आम्ही ते बोलणार नाही. आजचा प्रसंग तो बोलण्याचा नाही. प्रसंग आपला अभिनंदन करण्याचा आहे. मुंबई राज्य म्हणून ओळखले जातात तेव्हा 1937 साली गणेश माळवणकर यांनी त्याचे अध्यक्षपद भूषवले होते आणि त्यानंतर लोकसभा स्थापन झाली, त्याला सुद्धा मानकर लोकसभेचे अध्यक्ष होते. आज पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कदाचित आमच्या समोरील अध्यक्ष पुढे जाऊन लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकतील अशीच शक्यता निर्माण झाली आहे.

(हेही वाचा सुधीर मुनगंटीवारांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी! विधानसभेत तुफान फटकेबाजी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.